शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक संस्थांना ‘फायर ऑडिट’साठी नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 11:02 IST

Khamgaon News शहरातील शैक्षणिक संस्था व पेट्रोलपंप संचालकांना नोटीस बजावल्याची माहिती देण्यात आली.  

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव :  शैक्षणिक संस्थांना अग्निशमन यंत्रणा बसविण्यासंदर्भात सूचना दिली असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, शासकीय रुग्णालये आणि दवाखान्यांसोबतच शैक्षणिक संस्थांच्या ‘फायर ऑडिट’चा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला विचारणा केली असता शहरातील शैक्षणिक संस्था व पेट्रोलपंप संचालकांना नोटीस बजावल्याची माहिती देण्यात आली.  विद्यार्थी सुरक्षा लक्षात घेता शाळा, महाविद्यालयांचे फायर ऑडिट  लवकर पूर्ण करण्याची मागणी  पालकांकडून होत आहे.  भंडाऱ्यातील घटनेनंतर या मागणीने जोर धरला आहे. तामिळनाडूतील कुंभकोणममधील प्राथमिक शाळेला लागलेल्या आगीमध्ये होरपळून १४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने शाळांच्या फायर ऑडिटचा मुद्दा चर्चेला आला. परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर  सुरतमधील खासगी क्लासच्या आगीची दुर्घटनांमुळे शाळा, महाविद्यालयांमधील अग्निशमन सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.शाळा, महाविद्यलयांमध्ये अग्निशमन सुरक्षा नियमांना केराची टोपली दाखविण्यात येत असल्याने पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली.  शाळांच्या इमारतींचे फायर ऑडिट करून आवश्यक त्या सुरक्षा यंत्रणा अद्ययावत व कार्यान्वित कराव्यात, अशी मागणी हाेत आहे.

दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येते, हे दुर्दैवी आहे. विद्यार्थी सुरक्षेसाठी शाळांमध्ये आगप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित असणे अत्यावश्यक असून, शिक्षण विभागाने शाळांना मान्यता देतानाच यासंदर्भातील पडताळणी करून घेण्याची गरज आहे.          

 - पालक, खामगाव

टॅग्स :khamgaonखामगावfireआग