शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

बहूमताअभावी सरपंचावरील अविश्वास ठराव बारगळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 1:29 PM

सिंदखेडराजा : गोरेगाव येथील सरपंच सौ.सिमा संजय पंचाळ यांच्याविरुद्ध १६ आॅक्टोबर रोजी तहसिलदार यांच्या समक्ष तहसिल कार्यालयात सहा सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यावर २३ आॅक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले असता बहूमता अभावी अविश्वास ठराव रद्द करण्यात आला. असा निर्णय प्रभारी तहसिलदार सारीका भगत यांनी दिला. गोरेगाव ...

ठळक मुद्देगोरेगाव ग्रामपंचायत

सिंदखेडराजा : गोरेगाव येथील सरपंच सौ.सिमा संजय पंचाळ यांच्याविरुद्ध १६ आॅक्टोबर रोजी तहसिलदार यांच्या समक्ष तहसिल कार्यालयात सहा सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यावर २३ आॅक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले असता बहूमता अभावी अविश्वास ठराव रद्द करण्यात आला. असा निर्णय प्रभारी तहसिलदार सारीका भगत यांनी दिला. गोरेगाव येथे कायमस्वरुपी नळयोजना मुख्यमंत्री पेयजल योजनेतून मंजूर होताच काही नागरिकांनी योजनेविरुद्ध रनकंदन उठविले होते. या योजनेचे श्रेय कोणत्याही परिस्थितीत सरपंच सौ.सिमा संजय पंचाळ यांना मिळू नये म्हणून त्यांच्यावर वेगवेगळ्या स्वरुपाचे आरोप करुन १६ आॅक्टोबर रोजी तहसिलदार संतोष कणसे यांच्या कार्यालयात उपसरपंच रहिमखा शेरखा पठाण, गिताबाई संतोष गवई, गौतम कोंडूबा गवई, रामदास उत्तमराव पंचाळ, कमल अशोक कव्हळे आणि शिवगंगा उद्धव पंचाळ या सहा ग्रामपंचायत सदस्यांनी प्रत्यक्ष हजर राहून अविश्वास ठराव दाखल केला होता. त्या ठरावावर चर्चा करण्यासाठी आणि प्रत्यक्ष मतदान घेण्यासाठी २३ आॅक्टोबर रोजी ग्रामपंचायत गोरेगाव येथे प्रभारी तहसिलदार सारीका भगत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीला गौतम कोंडूबा गवई, रामदास उत्तमराव पंचाळ, कमल अशोक कव्हळे आणि शिवगंगा उद्धव पंचाळ हे चारच सदस्य हजर होते. या चार सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. ग्राम पंचायत मुंबई अधिनियम १९५८ कलम उपमध्ये नमुद केल्यानुसार सर्वसाधारण सरपंच पदाकरीता अविश्वास दाखल करण्याकरीता २/३ पेक्षा कमी नसेल तरच बहूमताने ठराव पारित होवू शकतो. सरपंचावरील अविश्वास ठराव पारित करण्यासाठी सात पैकी पाच सदस्यांनी पाठींबा देणे आवश्यक होते. परंतु आज चार सदस्यांनी अविश्वास ठरावाला पाठींबा दर्शविल्याने बहुमताने असा ठराव संमत होत नाही. त्यामुळे सरपंच सौ.सिमा संजय पंचाळ यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय प्रभारी तहसिलदार सारीका भगत यांनी दिला. अविश्वास ठराव मतदानाच्या वेळी पटवारी मांडगे, ग्रामसेवक मनोज मोरे यांनी सहकार्य केले. तर ठाणेदार सचिन शिंदे, पोहेकॉ गणेश डोईफोडे यांचेसह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती