शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
2
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
3
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
4
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
5
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
6
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
7
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
8
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
9
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
10
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
11
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
12
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
13
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
14
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
15
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
16
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
17
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
18
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
19
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
20
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार

माणसे जोडण्याचे काम ना. घ. यांच्या कवितेने केले - देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:16 IST

मेहकर : माणसे जोडण्याचे काम साहित्य करते, ना.घं.च्या  कवितांनीही माणसे जोडण्याचेच काम केले. अख्ख्या  महाराष्ट्राला वेड लावण्याची ताकद ना.घं.च्या कवितेत होती,  अशा शब्दात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कथाकार  डॉ.सदानंद देशमुख यांनी ना.घं.च्या आठवणींना उजाळा दिला.

ठळक मुद्देकविवर्य ना.घ.देशपांडे यांची १0८ वी जयंतीडॉ. सदानंद देशमुख यांनी दिला ना.घं.च्या आठवणींना उजाळा अरविंद उमाळकर मंगल कार्यालयात पार पडला कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : माणसे जोडण्याचे काम साहित्य करते, ना.घं.च्या  कवितांनीही माणसे जोडण्याचेच काम केले. अख्ख्या  महाराष्ट्राला वेड लावण्याची ताकद ना.घं.च्या कवितेत होती,  अशा शब्दात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कथाकार  डॉ.सदानंद देशमुख यांनी ना.घं.च्या आठवणींना उजाळा दिला.कविवर्य ना.घ.देशपांडे यांच्या १0८ व्या जयंतीचा कार्यक्रम  बुधवारला शहरातील श्री भगवान परशुराम प्रतिष्ठाणने  स्व.अरविंद उमाळकर मंगल कार्यालयात आयोजित केला होता.  यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना.घं.च्या  नात तथा मुख्याध्यापिका उमा जोशी तर प्रमुख उपस्थितीत  काँग्रेस राज्य कार्यकारिणी सरचिटणीस श्याम उमाळकर, कवी  अजीम नवाज राही, सभापती माधवराव जाधव, भाजपा महिला  आघाडी जिल्हाध्यक्ष अर्चना पांडे, भाजपाचे विस्तारक राजेंद्र  टाकळकर, प्रतिष्ठाण अध्यक्ष, जयदीप दलाल, माजी सरपंच  डॉ.सतीश कुळकर्णी होते. डॉ.सदानंद देशमुख म्हणाले की,  काळ परिवर्तनशील असला, तरी आपण संत ज्ञानेश्‍वर, संत  तुकाराम, अण्णाभाऊ साठे यांच्या सारख्यांना जसे विसरु शकत  नाही तसेच ना.घं.नाही कोणीच विसरणार नाही. मुंबई, पुण्या तील साहित्यिक मेहकरला ना.घं.मुळे ओळखतात. साहि ित्यकांच्या मनात आत्मविश्‍वास निर्माण करण्याचे काम त्यांच्या  कवितेने केले. यावेळी श्याम उमाळकर म्हणाले की, ना.घं.च्या  कवितांनी घेतलेल्या उंच भरारीमुळे मेहकरची ओळख साहित्य  क्षेत्रात झाली. आपण वाढदिवशी दिवा लावतो, म्हणजेच  अंधारातून उजेडाकडे चालतो, हे मराठी संस्कृतीचे वैशिष्ट्य  आहे. कवी ना.घ. यांच्या लेखणीतून उतरलेल्या कवितेवर  आजही महाराष्ट्राचं तेवढंच प्रेम आहे. या कवीचे मेहकरात  लवकरात लवकर स्मारक व्हावे, ही इच्छा त्यांनी बोलून  दाखविली. कवी अजीम नवाज राही यावेळी म्हणाले की,  प्रसिद्धीची कोणतीच माध्यमे उपलब्ध नसतानाही ना.घं.ची शीळ  रानारानात पोहोचली एवढे महान व्यक्तिमत्त्व ना.घं.होते.  ना.घं.ना प्रेमाचे शाहीर, हिरव्या बोलीचे शाहीर संबोधले जायचे.  यावेळी राजेंद्र टाकळकर, उमा जोशी यांची भाषणे झाली. प्रास् ताविक जयश्री कविमंडन यांनी केले. संचालन किरण जोशी तर  आभार नगरसेवक विकास जोशी यांनी मानले. यशस्वीतेसाठी  प्रतिष्ठाणचे अध्यक्ष जयदीप दलाल, कार्याध्यक्ष संदीप तट्टे,  संजय शर्मा, अँड.इंद्रजीत सावजी, भूषण पाठक, रोषण पाठक,  नीलेश बावणे, नरहरी जोशी, सचिन जोशी, जयदेव पितळे,  अनिल खंडेलवाल, उमाकांत जोशी, अंकित शर्मा, विनय  तळणीकर, सोनु चौधरी, वैभव महाजन, रवींद्र महाजनसह प्र ितष्ठाणच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.