शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील ‘टीईटी’ नसलेल्या शिक्षकांचे वेतन बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 15:02 IST

टीईटी नसलेल्या शिक्षकांचे १ जानेवारी २०२० पासून वेतन थांबविण्याच्या सुचना शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.

- ब्रह्मानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: प्राथमिक शिक्षकांकरीता (इयत्ता पहिली ते आठवी) शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक आहे. १३ फेबु्रवारी २०१३ ते ६ फेब्रुवारी २०१९ पर्यंतच्या कालावधीमध्ये नियुक्त झालेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिलेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील टीईटी नसलेल्या शिक्षकांचे १ जानेवारी २०२० पासून वेतन थांबविण्याच्या सुचना शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. त्यामुळे टीईटी नसलेले शिक्षक संकटात सापडले आहेत.प्राथमिक शिक्षकांकरिता शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्यासाठी वेळोवळी शिक्षण विभागाकडून आदेश काढण्यात आले. १३ फेब्रुवारी २०१३ नंतर ६ फेब्रुवारी २०१९ या कालावधीमध्ये नियुक्त झालेल्या अनुदानित, विनाअनुदानित यासह सर्व माध्यमाच्या शाळांवरील प्राथमिक शिक्षकांना टीईटी उत्तीर्णची अट घालण्यात आली आहे. अशा शिक्षकांसाठी तीन वेळा टीईटीची संधी देण्यात आली होती. परंतू या तीनही वेळा परीक्षेची काठीण्य पातळी वाढविण्यात आल्याने अनेक शिक्षक टीईटी उत्तीर्ण होऊ शकले नसल्याची आरोड शिक्षकांमधून होत आहे. आता तर १ जानेवारी २०२० पासून जिल्ह्यातील टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांचे वेतन थांबविण्याचे आदेशच देण्यात आले आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना दिलेल्या पत्रामध्ये टीईटी नसलेल्या शिक्षकांचे देयक न काढण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आठ ते दहा वर्षापासून बिनपगारावर काम करणाºया शिक्षकांनाही आता घरी बसण्याची वेळ आली आहे. राज्यातील १५ हजार शिक्षकांचा यामध्ये समावेश आहे. त्यात १०० टक्के अनुदानातील आठ हजार शिक्षक आहेत.जिल्ह्यात शंभरावर शिक्षक२०१३ नंतर नियुक्त झालेल्या व टीईटी नसलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याची प्रत्यक्ष कार्यवाही आता सुरू झाली आहे. जिल्ह्यात खाजगी शिक्षण संस्थामधील अनुदानित व विनाअनुदानित शाळेवरील टीईटी नसलेल्या शिक्षकांची संख्या १०० पर्यंत आहे. तर माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत टीईटी अनुतिर्ण असलेले २९ शिक्षक आहेत. त्यामध्ये अमरावती विभागामध्ये सुमारे ४०० च्या आसपास ही शिक्षक संख्या आहे.शिक्षकांनी टीईटी उत्तीर्ण होण्याबाबतचे निर्णय अनेकवेळा घेतले. काही वेळा ते निर्णय रद्दही करण्यात आले. तरीसूद्धा या कार्यकाळामध्ये शिक्षण विभागाकडून शिक्षकांच्या नवीन नियुक्त्या थांबविण्यात आल्या नाहीत. शिक्षक पात्रता परीक्षेला आमचा विरोध नाही. परंतू जे-जे शिक्षक सेवेत रूजू आहेत, त्यांना टीईटी उत्तीर्ण करण्याच्या जाचक अटीमधून तात्काळ मुक्तता देण्यात यावी. त्यांचे आज कुटुंब रस्त्यावर आले आहे.- सुरेश धामणे, कार्याध्यक्ष,टीईटी संघर्ष समिती, नागपूर.

२०१३ नंतर नियुक्त झालेले व टीईटी नसलेल्या शिक्षकांचे वेतन थांबविण्या संदर्भात मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकाºयांना पत्र पाठविण्यात आले आहे. खाजगी शिक्षण संस्थातील अनुदानित व विनाअनुदानित कर्मचाºयांची सेवा समाप्तीची कार्यवाही संबंधित शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या स्तरावर करावी. टीईटी नसलेल्या शिक्षकांची सेवा संबंधित शैक्षणिक संस्थांनी यापुढे सुरू ठेवल्यास शासकीय वेतन अनुदान अनुज्ञेय राहणार नाही.- एजाजुल खान, शिक्षणाधिकारी.

टॅग्स :buldhanaबुलडाणाTeacherशिक्षक