शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नऊ खासगी प्रवाशी गाड्या लुटल्या;  ३५ बॅग पळवल्या, तीन आरोपींना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 14:25 IST

नऊ खासगी प्रवाशी वाहतूक करणाºया वाहनातील असा ३५ बॅग या दरोडेखोरांनी लुटल्या आहेत.

बुलडाणा/देऊळगाव राजा:  बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावमही नजीक असलेल्या खडकपूर्णा पुलाच्या सुरू असलेल्या बांधकामाचा फायदा घेत अकोल्याकडे जाणाºया खासगी प्रवाशी गाड्यांमधील तब्बल ३५ बॅगा दरोडेखोरांनी लंपास केल्याचा प्रकार सात फेब्रुवारी रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आला. दरम्यान, या प्रकरणी टाकरखेड भागीले येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे देऊळगाव राजा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.अटक करण्यात आलेले हे सर्व आरोपी हे उस्मानाबाद जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असून सध्या देऊळगाव राजा पोलिसांनी अटक केलेल्या तिघांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले आहे. देऊळगाव राजा शहरापासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या खडकपूर्णा नदीवरील पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे येथून जाणाºया वाहनांचा वेग कमी होता. त्याचा फायदा घेत या दरोडेखोरांनी वाहनाच्या मागील बाजूस असलेल्या डिक्कीतून प्रवाशांच्या बॅगा लुटण्याचा प्रकार येथ केला. जवळपास नऊ खासगी प्रवाशी वाहतूक करणाºया वाहनातील असा ३५ बॅग या दरोडेखोरांनी लुटल्या आहेत. दरम्यान पहाटे हा प्रकार एका खासगी  बस चालकाच्या लक्षात आला. सोबतच टाकरखेड भागीले येथील काही नागरिकांनाही ही बाब समजली. त्यानंतर देऊळगाव मही पोलिस चौकीस याची माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठले व टाकरखेड भागीले येथील नागरिकांच्या मदतीने तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. चार जण फरार झाले आहे. मात्र या दरम्यान पोलिसानी दरोडेखोरांनी लुटलेल्या ३५ बॅग परत मिळविण्यास यश मिळविले आहे.

दरोड्यासाठी ट्रकचा वापरउस्मानाबाद जिल्ह्यातील या टोळीत एकूण सात जण आहे. दरोड्यासाठी ते ट्रकचा वापर करत होते. देऊळगाव मही नजीकच्या खडकपूर्णा नदीवरील पुलाचे सुरू असलेले बांधकाम व तेथील भौगोलिक परिस्थितीममुळे या पुलावर वाहनांचा वेग अत्यंत कमी होतो. त्याचा फायदा घेत या दरोडेखोरांनी या सुमारे २०० मीटरच्या पट्ट्यात खासगी प्रवाशी वाहतूक करणाºया वाहनाच्या मागील डिक्कीचे कुलूप फोडत त्यातून प्रवाशांच्या बॅगा लंपास करत ट्रकमध्ये टाकून पलायन करण्याचा त्यांचा मनसुबा होता.  मात्र टाकरखेड भागीले येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यावर पाणी फेरल्या गेले.

खामगाव, अकोला परिसरातही दरोड्याचा प्रयत्नअटक करण्यात आलेले तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांचे चार सहकारी फरार झालेले आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसापासून अकोला, खामगाव परिसरातील मार्गावर अशाच पद्धतीने त्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यात एका प्रवाशाच्या बॅगमधून पैसे मिळाल्यानंतर चांगले कपडे सुद्धा या आरोपींनी खरेदी केल्याची माहिती देऊळगाव राजाचे पोलिस निरीक्षक संभाजी पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

मोठी टोळी असण्याची शक्यताउस्मानाबाद जिल्ह्यातील हे आरोपी असून सराईत गुन्हेगार असल्याने अद्याप त्यांच्याकडून चौकशीत पोलिसांना सहकार्य होत नसल्याचेही समोर येत आहे. मात्र या दरोडेखोरांची मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्यता असून आंतरजिल्हा स्तरावरील अनेक मोठे गुन्हे या दरोडेखोरांना अटक करण्यात आल्यामुळे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी