शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-ॲपे अपघातात नवविवाहिता ठार, सासु-सासरे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 10:42 IST

Accident News : ॲपेतून प्रवास करणाऱ्या २० वर्षीय नविवाहितेचा ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : दहीगावकडे प्रवाशी घेऊन जाणाऱ्या ॲपेला ट्रकने पुढे जाण्याच्या नादात धडक दिल्याने ॲपेतून प्रवास करणाऱ्या २० वर्षीय नविवाहितेचा ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला. दरम्यान मृत विवाहीतेचे सासू-सासरे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात ९ जुलै रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास बोरगाव वसू गावाजवळ घडला.शितल मंगेश होगे, असे मृतक नवविवाहितेचे नाव असून गेल्या २८ मे रोजीच ती विवाह बंधनात अडकली होती. शितल आणि तिचे सासरे भास्कर होगे (५५), सासू लता होगे (५०) हे चिखलीवरून दहीगावकडे प्रवासी ॲपेद्वारे (एमएच-२८-एच-४७२३) जात होते. दरम्यान चिखली - खामगाव महामार्गावरील बोरगाव वसू गावाजवळ एमएल-०१-एडी-११८७ क्रमांकाच्या ट्रकने या ॲपेला अेाव्हटेक करण्याच्या प्रयत्नात धडक दिली. त्यामुळे ॲपेत बसलेल्या शितल होगे बाहेर फेकल्या गेल्या. त्यातच ट्रकच्या मागील चाकात त्या आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर सासू सासरे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर चिखली येथे उपचार करण्यात येत आहेत. मृतक शितल हीचे २८ मे रोजी लग्न झाले होते. लग्न होवून जेमतेम ४२ दिवस उलटण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने झडप घातली.तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल काळे हे करीत आहेत.

टॅग्स :ChikhliचिखलीAccidentअपघात