शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेचा खून

By admin | Updated: April 6, 2017 00:58 IST

मलकापूर : ११ दिवसांपूर्वी मनाविरुद्ध प्रेमविवाह केलेल्या मुलीचा जन्मदात्या पित्यानेच निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील निमखेड येथे बुधवारी घडली.

जन्मदात्या बापाविरुद्ध गुन्हा दाखल: ११ दिवसांपूर्वी झाला होता आंतरजातीय विवाह मलकापूर : ११ दिवसांपूर्वी मनाविरुद्ध प्रेमविवाह केलेल्या मुलीचा जन्मदात्या पित्यानेच निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील निमखेड येथे बुधवारी घडली. दरम्यान, याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी मुलीच्या पित्याविरुद्ध रात्री उशिरा भादंवि ३0२ कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. निमखेड येथील गणेश गजानन हिंगणे (२७) व मनीषा बाळू हिवरे (२१) यांनी २६ मार्च रोजी मंदिरात प्रेमविवाह केला होता. विवाह केल्यानंतर गणेश व मनीषा जवळपास एक आठवडा मलकापूर येथे राहिले. त्यानंतर गेल्या आठवड्यातच निमखेड येथे गणेशच्या घरी राहायला आले होते. दरम्यान, बुधवारी दुपारी गणेश कामानिमित्त बुलडाणा येथे गेला होता. त्याचे वडील गजानन हिंगणे हेसुद्धा दाताळा येथे बँकेत कामानिमित्त गेले होते, तर गणेशची आई कापूस वेचण्यासाठी शेतात गेली असल्याने मनीषा घरी एकटीच होती. नेमक्या याचवेळी तिचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला. हातावरील मेंदी सुकली नाही!गणेश व मनीषा हे दोघेही निमखेड येथे एकमेकांच्या घराजवळच राहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे एकमेकांवर प्रेम जुळले आणि त्यांनी शेवटपर्यंत सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या. २६ मार्चला मंदिरात विवाहही केला; परंतु अवघ्या ११ दिवसांतच मनीषाची हत्या झाल्याने त्यांच्या सुखी संसाराचे स्वप्न अर्धवट राहिले. हातावरील मेंदी सुकण्याच्या आतच मनीषाची झालेली हत्या अनेकांच्या मनाला चटका लावून गेली आहे. हल्ल्यानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सदर विवाहितेवर हल्ला झाल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत तिला तिच्यावर हल्ला कुणी केला, असा प्रश्न विचारतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सदर विवाहितेला तुझ्यावर हल्ला कुणी केला, तुझ्या वडिलाने केला काय? असे प्रश्न विचारण्यात येत आहेत. या व्हिडिओची वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा सुरू आहे.हत्या करणाऱ्या बापाला अटक मनीषाची हत्या केल्यानंतर बाळू हिवरे याने जावई गणेशला भ्रमणध्वनीद्वारे या कृत्याची माहिती दिली. लगेचच गणेशने बुलडाणा येथून निमखेड येथील परमेश्वर क्षीरसागर यांना कळवून घरी पाठवले व स्वत: निमखेडकडे धाव घेतली. गणेशने मित्रासोबत घर गाठले त्यावेळी मनीषा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. मनीषाने स्वत:च्या वडिलांनीच हे क्रूर कृत्य केल्याचे सांगितले. यावेळी पोलीस पाटील, दिनकर दोडे व गणेशचा मित्र गवळी हजर होते. जखमी मनीषाला तत्काळ मलकापूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले; परंतु घाव वर्मी लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, बाळू हिवरेला बोराखेडी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध रात्री उशिरा भादंवि ३0२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.