शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘नेरी’ करणार लोणारच्या पाण्याची तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 08:11 IST

सरोवरातील पाण्याचे नमुने हे नागपूर येथील नेरी संस्थेकडे आम्ही तपासणीसाठी पाठविणार आहोत. सोबतच सरोवराशी संबंधित जुने संशोधन अहवालही तपासण्याबाबत आपण अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे.

नीलेश जोशी 

बुलडाणा : आगळे वेगळे महत्त्व असलेल्या लोणार सरोवरातील पाण्याला लालसर रंग आल्याच्या पार्श्वभूमीवर आता वन्य जीव विभाग नागपूर येथील नॅशनल इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च सेंटरकडे सरोवरातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविणार आहे. हे पाणी नेमके लाल होण्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी जुने संशोधन अहवालही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासण्यास सुरुवात केली आहे.

गत काही दिवसांपासून लोणार सरोवरातील पाणी हे लालसर रंगाचे दिसण्यास सुरुवात झाली होती. नऊ जून रोजी ते ठळकपणे दिसण्यास प्रारंभ झाला होता. हेलोबॅक्टेरिया व ड्युनेलिया सलीना नावाच्या कवक अर्थात बुरशीची खाºया पाण्याच्या या सरोवरात वाढ झाल्याने कॅरोटेनाईड नावाचा रंगयुक्त पदार्थ स्त्रवल्यामुळे पाण्याचा रंग लालसर झाला असावा, असा कयास प्रा. डॉ. सुरेश मापारी यांनी व्यक्त केला होता. सोबतच ग्लोबल वार्मिंगशीही याचा संदर्भ वैज्ञानिक मार्गदर्शक आनंद मिश्रा जोडत आहेत.दुसरीकडे स्थानिक जुन्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार साधारणत: पावसाळ््याच्या सुरुवातीला सरोवरातील पाण्याचा यापूर्वी असा लालसर रंग झाल्याचे सांगितले जाते, असे वन विभागातील एका अधिकाºयाने सांगितले.सरोवरातील पाण्याचे नमुने हे नागपूर येथील नेरी संस्थेकडे आम्ही तपासणीसाठी पाठविणार आहोत. सोबतच सरोवराशी संबंधित जुने संशोधन अहवालही तपासण्याबाबत आपण अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे.- मनोजकुमार खैरनार, विभागीय वन अधिकारी, वन्य जीव विभागउल्कापातामुळे तयार झालेल्या लोणार येथील खाºया पाण्याच्या सरोवरातील पाण्याचा रंग अचानक लालसर झाला आहे. हेलोबॅक्टेरिया आणि ‘ड्युनोलिला सलीना’ कवकाची (बुरशी) खाºया पाण्यात मोठी वाढ झाल्यामुळे कॅरोटेनॉईड नावाचा रंगयुक्त पदार्थ स्त्रवतो. त्यामुळे पाणी लालसर झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

टॅग्स :Lonarलोणार