शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग, निराधार योजनेच्या पैशासाठी भाच्याने केला आत्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 18:02 IST

मोताळा : दिव्यांग आणि निराधार योजनेच्या पैशासाठी भाच्याने चक्क आत्याचा कुऱ्हाडीने खून केल्याची घटना तालुक्यातील तालखेड येथे सोमवारी रात्री १२ वाजेदरम्यान घडली.

मोताळा : दिव्यांग आणि निराधार योजनेच्या पैशासाठी भाच्याने चक्क आत्याचा कुऱ्हाडीने खून केल्याची घटना तालुक्यातील तालखेड येथे सोमवारी रात्री १२ वाजेदरम्यान घडली. या हत्याकांडात आरोपी  भाच्याला त्याच्या एका मित्राने मदत केली असून दोघांनाही बोराखेडी पोलिसांनी सोमवारी अटक केली. तालुक्यातील तालखेड येथील प्रभाकर निनू चोपडे (६०) यांची बहीण नलुबाई निना चोपडे (६५) या भाऊ बाळकृष्ण निनू चोपडे यांच्या घरात राहत होत्या. बाळकृष्ण चोपडे यांचे निधन झाल्यानंतर नलुबाई त्यांचा भाचा राहुल बाळकृष्ण चोपडे यांच्यासोबत राहायला लागल्या. नलुबाई चोपडे जन्मापासून उजव्या पायाने दिव्यांग असून, त्यांना शासनाकडून दिव्यांग व निराधार योजनेतून दरमहा अनुदान मिळत होते. भाचा राहुल नेहमी आत्या नलुबाई यांना योजनेचे पैसे मागत होता. या कारणावरून राहुल व नलुबाई यांच्यात नेहमी वाद होत होता. या वादाच्या कारणावरून सोमवार, १० जूनच्या रात्री साडे अकरा ते बारा वाजताच्या सुमारास भाचा राहुलने आत्या नलुबाई यांच्या कपाळावर व उजव्या कानावर कुºहाडीने वार करून तिचा खून केला. नलुबाईला ठार मारण्यात राहुल चोपडे याला त्याचा मित्र पवन हरी चौधरी (२०, रा. तालखेड) याने मदत केली, असे तक्रारीत नमूद आहे. तालखेड येथील प्रभाकर निनू चोपडे (६०) यांनी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच बोराखेडीचे पीएसआय प्रल्हाद मदन, एएसआय विनोद शिंदे, पोलीस हेड काँस्टेबल राजेश वानखेडे, पोलीस काँस्टेबल संजय गोरे, सुनील भवटे, मोरे, चालक शेख मुस्तकीम यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला. दरम्यान, पीएसआय मदन यांनी आरोपींचा शोध घेऊन काही तासातच दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या. (तालुका प्रतिनिधी) आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडीयाप्रकरणी प्रभाकर निनू चोपडे यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी राहुल बाळकृष्ण चोपडे व पवन हरी चौधरी या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना १३ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारीMotalaमोताळा