शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

प्रतीक्षेनंतर ‘नवोदय’चा निकाल जाहीर; ८० विद्यार्थ्यांची यादी घोषीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 17:12 IST

बुलडाणा :  जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी एप्रिलमध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे

ठळक मुद्देराज्यातील सहा जिल्ह्यात इयत्ता सहावीचा नवोदय परिक्षांचा निकाल प्रलंबीत होता. ‘लोकमत’मध्ये २७ जुलै रोजी ‘नवोदय परीक्षेचा निकाल रखडला’ असे वृत्त प्रकाशीत करण्यात आले होते. त्यानंतर ८ आॅगस्ट रोजी बुलडाणा जिल्ह्याचा ‘नवोदय परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.

बुलडाणा :  जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी एप्रिलमध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाभरातून  नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या ८० विद्यार्थ्यांची यादी घोषीत करण्यात आली असून पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी होत असतानाही  राज्यातील सहा जिल्ह्यात इयत्ता सहावीचा नवोदय परिक्षांचा निकाल प्रलंबीत होता. बुलडाणा, भंडारा, गडचिरोली, पालघर, मुंबई उपनगर, मुंबई शहर या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नवोदय परिक्षेच्या निकालाची प्रतीक्षा लागली होती. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये २७ जुलै रोजी ‘नवोदय परीक्षेचा निकाल रखडला’ असे वृत्त प्रकाशीत करण्यात आले होते. दरम्यान, या वृत्ताची दखल घेत निकालाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून करण्यात आल्या. त्यानंतर ८ आॅगस्ट रोजी बुलडाणा जिल्ह्याचा ‘नवोदय परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये ८० विद्यार्थ्यांची यादी नवोदय विद्यालयाच्या संकेतस्थळावर घोषीत करण्यात आली आहे. यामध्ये ५१ मुले व २८ मुलींचा समावेश आहे. शाळा सुरू होऊन दीड महिन्यानंतर  नवोदयची परीक्षा दिलेल्या सहावीच्या  विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. परंतू विद्यार्थ्यांनी इतर शाळांमध्ये प्रवेश घेऊन शैक्षणीक शुल्कही भरलेला आहे. त्यामुळे आता निकाल लागल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचा नवोदय विद्यालयासाठी प्रवेश निश्चीत झाला त्यांना शाळांमध्ये भरलेली फी परत न मिळण्याच्या व इतर अडचणी येऊ शकतात.  निकाल लागल्यानंतर १० दिवसात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असल्याने त्या दृष्टीने सध्या नवोदय विद्यालयाकडून हालचाली सुरू आहेत. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाexamपरीक्षा