शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला निकृष्टतेचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 17:53 IST

खामगाव :  शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय सुमार दर्जाचे होत आहे. निर्माणावस्थेतच या रस्त्याच्या बांधकामाला तडे जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

 - अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय सुमार दर्जाचे होत आहे. निर्माणावस्थेतच या रस्त्याच्या बांधकामाला तडे जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. खामगाव शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास सुमारे दोन महिन्यांपूर्वी सुरूवात करण्यात आली.  यामध्ये  बाळापूर नाका ते विकमसी चौक आणि विकमसी चौक ते टिळकपुतळा, टिळक पुतळा ते बस स्थानक चौक, बस स्थानक चौक ते टॉवर चौक आणि टॉवर चौक ते नांदुरा रोडवर रस्त्याच्या दुतर्फा नाली बांधकाम करण्यात येत आहे. दरम्यान, सुरूवातीला सेंटरलाईन, विविध शासकीय कार्यालयांची परवानगी, भूमिअभिलेख विभागाकडून मोजणी यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम चर्चेत आले. त्यानंतर लागलीच कामाच्या निकृष्ट दर्जामुळे पुन्हा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण प्रकाश झोतात आले आहे. गेल्याच आठवड्यात कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे शहर पोलिस स्टेशन आणि पालिकेचा पाणी पुरवठा प्रभावित झाला होता. खामगाव पालिकेच्या व्यापारी गाळ्यासमोरील परिसरात नाली बांधकाम करताना पाईपलाईन फोडली होती. यासंदर्भात रस्त्याच्या चौपदरीकरणाचा कंत्राट असलेल्या जान्दू कंपनीच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होवू शकले नाही.

रस्त्याची संरचना करताना भेदभाव !भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणी न करताच रस्त्यांची संरचना करण्यात येत असल्याची नागरिकांची ओरड सुरूवातीपासूनच होत आहे. परिणामी, पालिकेने डिसेंबर महिन्यात काम थांबविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाला पत्र दिले होते.  त्यानंतर वेळोवेळी पाईपलाईन फोडल्याप्रकरणी आणि पाईपलाईन स्थलांतरीत न केल्याप्रकरणी कंत्राटदाराला पालिकेने धारेवर धरले. त्याचवेळी मनमानी पध्दतीने संरचनेमुळे  चौपदरीकरणाचे काम भेदभावपूर्ण होत असल्याची ओरड होत आहे.  विकमसी चौक ते टिळक रस्त्याची संरचना करताना एका ‘हॉटेल’ व्यावसायिकास कंत्राटदाराकडून देण्यात आलेल्या झुकत्या मापाचा मुद्दा आता आणखी ऐरणीवर आला आहे. त्याचप्रमाणे नांदुरा रोडवरील एका बड्या व्यावसायिकाचे अतिक्रमणाला धक्का न लावण्याचा विषय सर्वसामान्यांमध्ये चर्चिल्या जात आहे.

टॅग्स :khamgaonखामगावhighwayमहामार्ग