शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

देशातील जनता ‘मोदीं’च्याच बाजूनेच ठाम -  घाटाखालील तीनही आमदारांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 14:13 IST

देशातील आणि महाराष्ट्रातील जनता ही पंतप्रधान मोदींच्या बाजूने भक्कमपणे उभी असल्याचा भाजपच्या घाटाखालील तिनही आमदारांनी केला आहे. 

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: सतराव्या लोकसभेत बुलडाणा आणि रावेर लोकसभा मतदार संघात युतीचे उमेदवार आघाडीवर असल्याने युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालिचा उत्साह संचारला आहे. त्याचवेळी देशातील आणि महाराष्ट्रातील जनता ही पंतप्रधान मोदींच्या बाजूने भक्कमपणे उभी असल्याचा भाजपच्या घाटाखालील तिनही आमदारांनी केला आहे. देशात, राज्यात आणि प्रत्येक लोकसभा मतदार संघात घराणेशाही विरोधात ‘विकास’ अशीच लढत झाली. या निवडणुकीत बुलडाणा आणि रावेर लोकसभा मतदार संघात युतीचे प्रतापराव जाधव आणि रक्षाताई खडसे आघाडीवर आहे. दुपारी २ वाजेपर्यंत प्रतापराव जाधव यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी प्रतापराव जाधव यांच्यावर सुमारे ५० हजारांची आघाडी घेतली. तर रक्षाताई खडसे यांनीही त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांच्या विरोधात मोठी आघाडी घेतली. त्यामुळे युतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, भविष्यातही ही घोडदौड कायम राहणार असल्याचा विश्वास आ. अ‍ॅड. आकाश फुंडकर, आ. चैनसुख संचेती आणि आ. डॉ. संजय कुटे यांनी  व्यक्त केला. देव-देश आणि धर्माच्या बाजूनेच जनता उभी राहील्याबद्दल त्यांनी मतदारांप्रती कृतज्ञताही व्यक्त केली.

 

देशात ‘फिर एक बार मोदी सरकार’च्या बाजूनेच जनतेचा मूड आहे. महाराष्ट्रातील जनतेनेही ‘मोदी’ सरकारच्याच दिशेने कौल दिला आहे. अनेक प्रकारच्या चर्चेनंतर जनतेने दिलेल्या ठाम निर्णयाचे स्वागत आहे. देव-देश आणि धर्म हितासाठी झालेल्या युतीच्या पाठीशीच जनता असल्याचे सिध्द झाले.

- चैनसुख संचेतीआमदार, मलकापूर विधानसभा मतदार संघ

मोदी आणि विकासाच्या बाजूनेच जनतेने कौल दिलाय. बुलडाणा लोकसभा मतदार संघातही युतीच्या बाजूनेच जनता उभी राहीली. काँग्रेसचा सुपडा संपूर्ण देशातून घराणे शाही हद्दपार झाली असून, युतीच्या कार्यकर्त्यांची मेहनत फळास आल्याचे समाधान आहे.

- अ‍ॅड. आकाश फुंडकरआमदार, खामगाव विधानसभा मतदार संघ

 

जनता युतीच्या पाठीशी असल्याचे निकालावरून दिसून येत आहे. बुलडाणा लोकसभा मतदार संघातील जळगाव विधानसभेत युतीच्या उमेदवारांना आघाडी आहे. प्रत्येक सच्चा कार्यकर्त्यांच्या अहोरात्र परिश्रमाचे हे फळ आहे.

- डॉ. संजय कुटेआमदार, जळगाव जामोद विधानसभा मतदार संघ

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल