शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरा : शेतकर्‍यांनी मोबदल्यासाठी महामार्गाचे काम पाडले बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 01:10 IST

नांदुरा : राष्ट्रीय महामार्ग  क्र.६ च्या विस्तारीकरणाचे काम सुरू असताना शासन संपादित जमिनीचा योग्य मोबदला देत नसल्याचा आरोप करीत संतप्त शेतकर्‍यांनी रविवार, २८ जानेवारी रोजी राष्ट्रीय महामार्गाच्या नांदुरा बायपासचे काम बंद पाडले. प्रत्येक शेतकर्‍याची शेती शासन वेगवेगळ्या भावाने खरेदी करीत असल्याने सर्व शेती शासनाच्या नवीन धोरणानुसार खरेदी करावी, अशी मागणी यावेळी शेतकर्‍यांनी केली.

ठळक मुद्देजमिनीचा योग्य मोबदला देत नसल्याचा संतप्त शेतकर्‍यांचा आरोपशासनाच्या नवीन धोरणानुसार शेती खरेदी करावी अशी शेतकर्‍यांची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : राष्ट्रीय महामार्ग  क्र.६ च्या विस्तारीकरणाचे काम सुरू असताना शासन संपादित जमिनीचा योग्य मोबदला देत नसल्याचा आरोप करीत संतप्त शेतकर्‍यांनी रविवार, २८ जानेवारी रोजी राष्ट्रीय महामार्गाच्या नांदुरा बायपासचे काम बंद पाडले. प्रत्येक शेतकर्‍याची शेती शासन वेगवेगळ्या भावाने खरेदी करीत असल्याने सर्व शेती शासनाच्या नवीन धोरणानुसार खरेदी करावी, अशी मागणी यावेळी शेतकर्‍यांनी केली.राष्ट्रीय महामार्ग क्र.६ चा नांदुरा बायपास नांदुरा खुर्द, खुदानपूर, नांदुरा बु. कोळंबा, वडाळी, खुनदानपूर या शिवारातून जात असून, त्याचे काम २८ जानेवारी रोजी सुरू होताच ज्यांची शेती राष्ट्रीय महामार्गात जात आहे, अशा सर्व शेतकर्‍यांनी एकत्रित येऊन काम बंद पाडले. प्रामुख्याने जुने वहिवाटीचे गाव रस्ते पूर्ववत सुरू करण्यासाठी छोटे पूल बांधणे, मोरी बांधून देणे किंवा पुलाखालून रस्ते कायम ठेवण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे, तर मलकापूर तालुक्यात १९00 रुपये स्क्वेअर मीटरने पैसे दिले असताना नांदुरा तालुक्यात १२0 ते ३५0 रुपये स्क्वेअर मीटरप्रमाणे पैसे देत आहेत. हा प्रकार नांदुरा तालुक्यातील शेतकर्‍यांवर अन्याय करणारा असल्याने मलकापूर व नांदुरा तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये व शेतीमध्ये अशी तफावत का, असा प्रश्न शेतकरी विचारात असून, सर्व शेतकर्‍यांना समान मोबदला नवीन नियमानुसार देण्यात यावा, अशी मागणी येथील शेतकर्‍यांनी केली आहे.रविवार सुटीचा दिवस असल्याने कोणताही अधिकारी या आंदोलनस्थळी उपस्थित नव्हता.  तरी शासनाने सर्व शेतकर्‍यांना मलकापूरप्रमाणे नवीन धोरणानुसारच मोबदला द्यावा, अशी मागणी केली. शेतकर्‍यांमध्ये नगरसेवक अनंता भारंबे, छोटूभाऊ तळाले, निनाजी नारखेडे, गजानन नारखेडे, भगवान परळकर यांच्यासह अन्य सहभागी होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावhighwayमहामार्ग