शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

नांदुरा : शेतकर्‍यांनी पुन्हा बंद पाडले महामार्गाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:30 IST

नांदुरा : राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या विस्तारीकरणाचे काम सुरू असताना शासन शेतीचा मोबदला पुरेसा देत नसून, प्रत्येक शेतकर्‍याची शेती वेगवेगळ्या भावाने खरेदी करीत असल्याचा आरोप करीत १ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महामार्ग नांदुरा बायपासचे काम पुन्हा शेतकर्‍यांनी बंद पाडले. 

ठळक मुद्देस्व.धर्मा पाटील यांना वाहिली श्रद्धांजली

किशोर खैरे। लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या विस्तारीकरणाचे काम सुरू असताना शासन शेतीचा मोबदला पुरेसा देत नसून, प्रत्येक शेतकर्‍याची शेती वेगवेगळ्या भावाने खरेदी करीत असल्याचा आरोप करीत १ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महामार्ग नांदुरा बायपासचे काम पुन्हा शेतकर्‍यांनी बंद पाडले. राष्ट्रीय महामार्ग ६ चा नांदुरा  बायपास तालुक्यातील १२ शिवारातून जात असून, त्याचे काम २८ जानेवारी रोजी सुरू होताच ज्यांची शेती नॅशनल हायवेत जात आहे अशा सर्व शेतकर्‍यांनी आज एकत्रित येऊन त्यांनी नॅशनल हायवेच्या नांदुरा बायपासचे काम बंद पाडले होते. त्यानंतर नॅशनल हायवेचे इंजिनिअर निखिल सिंग हे शेतकर्‍यांसोबत चर्चा करून निघून गेले; परंतु योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी पुन्हा १ फेब्रुवारी रोजी धर्मा पाटील या शेतकर्‍याला श्रद्धांजली वाहून पुन्हा आंदोलन केले.आंदोलकांनी आपली प्रमुख मागणी शेतीचे फेर मूल्यांकन करून नवीन कायद्यानुसार अकोला, बाळापूर तसेच जळगाव खांदेशच्या पृष्ठभुमीवर योग्य तो मोबदला देण्यात यावा. तसेच नांदुरा बायपासमध्ये जाणारे जुने शेतरस्ते तयार करून द्यावे फळबाग, अकृषक जमीन, विहिरी बोअरवेल, मोटार पंप वनझाडे याचंही मूल्यांकन करून मोबदला मिळावा, यासाठी पुढेही आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी शेतकर्‍यांनी केला. त्यानंतर महसूल प्रशासनाच्यावतीने नायब तहसीलदार गणेश पाटील, मलकापूरचे मार्कंड साहेब, ठाणेदार विलास पाटील यांनी शेतकर्‍यांशी चर्चा करून आंदोलन स्थगित केले; परंतु मोबदला न देता काम सुरू केल्यास ‘महाराष्ट्र शासना आता तरी जागा हो, आमच्या कष्टाच्या जमिनीची थोडी तरी जाण ठेव’, अशा घोषणा देऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नांदुरा तालुका राष्ट्रीय महामार्ग संघर्ष समितीने दिला आहे.शेतकर्‍यांमध्ये नगरसेवक अनंता भारंबे, अरूण नारखेडे, सत्यनारायण केला, छोटू तळोले, भगवान परळकर, स्नेहल नारखेडे, शशिकांत पाटील, राजू चोपडे, राजेंद्र डांगे, श्रीनिवास नारखेडे, गजानन तायडे, बबन जुनगडे, संजय भारंबे, नीलेश नारखेडे, राहुल ढवळे, अँड.ढवळे, अजय धामोडकर, दिलीप धामोडकर, विजय धामोडकर, गोपाल बानाईत, विष्णू धामोडकर, विजू पाटील, नितीन धामोडकर, भारत वसतकार यांच्यासह शेकडो शेतकरी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagitationआंदोलन