शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्याच्या  जिजामाता महाविद्यालयात रंगली सुरांची मैफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 14:42 IST

बुलडाणा : जिजामाता महाविद्यालयातील संगीत विभागाच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद याच्या जयंतीच्या पर्वावर स्नेहसंमेलनात एका विशेष संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे मैफलीची सुरुवात संगीत विभाग प्रमुख प्रा सुरेंद्र शेजे यांनी शंकर महादेवन यांच्या आवाजातील गणनायकाय गणदैवताय या गीताने गेली. एक प्यार का नगमा है...शोर चित्रपटातील गीत प्रा.किरण टाकळकर यांनी सादर केले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

बुलडाणा : जिजामाता महाविद्यालयातील संगीत विभागाच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद याच्या जयंतीच्या पर्वावर स्नेहसंमेलनात एका विशेष संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.मराठी व हिंदी गीतांच्या मैफलीची सुरुवात संगीत विभाग प्रमुख प्रा सुरेंद्र शेजे यांनी शंकर महादेवन यांच्या आवाजातील गणनायकाय गणदैवताय या गीताने गेली. प्रा शेजे यांनी गायलेल्या गीताला उपस्थित रसिकांनी उत्स्फुर्त दाद दिली. पारसमणी चित्रपटातील हसता हुआ नुरानी चेहरा हे गीत प्रा. किरण टाकळकर व प्रा. स्नेहल तायडे यांनी सादर कएले. याराना चित्रपटातील छुकर मेरे मनको हे गीत प्रा. सुभाष मोरे यांनी गायले. नटरंग या चित्रपटातील अप्सरा आली ही लावणी प्रा. प्रिती आराख यांनी गायली व मैफलीला एक वेगळीच रंगत आली व रसिकांनी मनसोक्त दाद दिली. एक प्यार का नगमा है...शोर चित्रपटातील गीत प्रा.किरण टाकळकर यांनी सादर केले. सध्याच्या काळात रिमीक्स व फ्युजन गाण्यांची आवड सगळ्यांच आवडते हाच रसिकांचा धागा पकडुन प्रा. गजानन लोहटे यांनी क्या हुवा तेरा वादा, लग ज्या गले या सारख्या विविध गीतांची श्रृंखला फ्युजन प्रकारात सादर करुन तरुणाईला आकर्षीत केले.लख्ख पडला प्रकाश हा...जाऊ द्या बाळासाहेब या चित्रपटातील हा गोंधळ दिग्वविजयसिंग राजपुत याने सादर  करुन रसिकांची उत्स्फुर्त दाद मिळविली. मैफलीच्या समारोपाला लयभारी चित्रपटातील गाजलेले  माऊली... माऊली  हे गीत प्रा सुरेंद्र शेजे यांनी गायले. या मैफलीला कु योगीता अहिरे, कु अनघा पाटील,कु वैशाली सोनुने, कु वैष्णवी पुराणीक यांचा कोरस होता. या संगीत मैफलीचे संगीत नियोजन प्रा. सुरेंद्र शेजे यांच्या मार्गदर्शनाखाली होते यात कि बोर्ड- सिंथेसायझर -श्रीकांत ढवळे, आक्टोपॅड-नंदकिशोर मानेकर, ढोलक- आतिश राजपुत यांची साजेशी व सुंदर साथसंगत लाभली. यासंगीत मैफलीचे आयोजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ई.जे. हेलगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.यासंगीत मैफलीचे संचालन प्रा. प्रिती आराख यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळाcultureसांस्कृतिक