शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

मस प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’च्या मार्गावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 11:14 IST

मस प्रकल्प ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात आठवडाभरामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे सात मध्यम प्रकल्पापैकी चार मध्यम प्रकल्पांमध्ये ६५ टक्क्यावर जलसाठा आहे. मस प्रकल्प ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पातूनही गेल्या ५६ तासांपासून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.दमदार पावसामुळे पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे. त्यामध्ये खडकपूर्णा प्रकल्प ७० टक्क्याने भरला आहे. तर सर्वाधिक मस प्रकल्पामध्ये जलसाठा आहे. पाटबंधारे उपविभाग खामगांव यांचे अंतर्गत सिंचन शाखा हिंगणा कार्यक्षेत्रातील जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प मस १०० टक्के पाण्याने भरला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास पावसामुळे धरणात येणारा पाण्याचा प्रवाह पूर्णपणे धरणाच्या सांडव्यावरून नदी पात्रात येणार आहे. या सांडव्यामुळे नदीला पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पातूनही सध्या दोन हजार क्युसेकचा विसर्ग होत आहे. खडकपूर्णा प्रकल्पाच्या उर्ध्व भागात तथा पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे खडकपूर्णा प्रकल्पात पाण्याचा येवा वाढला होता.परिणामी हा मोठा प्रकल्प ७० टक्क्यांपेक्षा जास्त भरला. त्यामुळे पूर नियंत्रणाकरीता प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला होता. त्यानुसार नदीकाठावरील जिल्ह्यातील १९ गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता. प्रकल्पातून पूर्ण १९ वक्रद्वारे ६० से. मी. ने उघडून ४५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग खडकपूर्णा नदी पात्रात सोडण्यात आला. सध्या धरण पाटबंधारे विभागाच्या नियमांनुसार उद्दिष्टपातळी पर्यंत आले असल्यामुळे धरणाचे १४ दरवाजे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.

तीन तालुक्यांना आधारखडकपूर्णाचे चार गेट अद्यापही चालू आहेत. दोन हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे. ५६ तासांपासून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा तालुक्यातील कोल्हापूरी बंधारे भरण्यास मदत झाली आहे. त्यामुळे या तिन्ही तालुक्यातील अनेक गावांतील भविष्यातील पाणी टंचाईचा प्रश्न मिटला आहे.

या गावांना सतर्कतेचा इशारामस नदीकाठावरील हिंगणा, कारेगांव, संभापूर, शेंद्री, लासूरा जहा, उमरा लासूरा व चितोडा या गावांना सतकर्तेचा इशारा देण्यात आला आहे. नदीला पूर आल्यास ही नदीकाठावरील जिल्ह्यातील गावे प्रभावीत होण्याची शक्यता आहे. उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग यांनी या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाDamधरण