शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

दागिन्यांच्या हव्यासापोटी चुलत सासूचा काढला काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 12:44 IST

Crime Case : नंदाबाई उद्धव चौधरी हिने  सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या मोहापायी वृद्ध महिलेचा गळा दाबून खून केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीबी : दागिन्यांच्या हव्यासापाेटी चुलत सासूची सुनेने हत्या केल्याची घटना भुमराळा शिवारात १९ सप्टेंबरला उघडकीस आली़  बिबी पाेलिसांनी १२ तासांत आराेपी सुनेला अटक केली आहे़ लोणार तालुक्यातील भुमराळा येथील वृद्ध महिला कासाबाई नारायण चौधरी (६५) ही महिला स्वतः च्या शेतात काम करत हाेती़.  यावेळी शेताशेजारी शेत असलेल्या नंदाबाई उद्धव चौधरी हिने  सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या मोहापायी वृद्ध महिलेचा गळा दाबून खून केला होता. वृद्ध महिलेचा खून झाल्याचे १९ सप्टेंबरला उघडकीस आले हाेते़.  या घटनेची फिर्याद पोलीस स्टेशन बिबी येथे दाखल होताच ठाणेदार एल. डी. तावरे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेची माहिती वरिष्ठांना कळवताच जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, पोलीस उपविभागीय अधिकारी विलास यामावार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळिराम गिते यांच्यासह ठसेतज्ज्ञ व श्वानपथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांच्या मार्गदर्शनाखाली बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार एल. डी. तावरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जिद्दमवार, शेळके, पोलीस उपनिरीक्षक किसन राठोड, पोलीस उपनिरीक्षक जायभाये , पोलीस अंमलदार मोहम्मद परशुवाले, अरुण सानप,जगदेव टेकाळे, शिवाजी दराडे, यशवंत जैवळ यांनी  अवघ्या १२ तासांत खुनाच्या आरोपीस अटक करून घटनेतील मुद्देमाल हस्तगत केला आहे.  मृत महिलेचा नातू मधुकर दत्ता मोरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी नंदाबाई उद्धव चौधरी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.या घटनेमुळे गावात खळबळ उडाली हाेती. पाेलिसांनी अवघ्या  तासातच आराेपीस अटक केली. 

असा लागला शाेध   वृद्ध महिलेची हत्या झाल्याचे समाेर येताच रविवारी बिबी पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली हाेती. यावेळी घटनास्थळावर श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले हाेते. श्वान आराेपी महिलेच्या घराजवळ घुटमळत हाेते. आराेपी दुसऱ्या मजल्यावर असल्यामुळे पाेलिसांना संशय आला. गावातही पाेलिसांनी चाैकशी केली असता संशय बळावला. अखेर महिलेची चाैकशी केली असता तिने गुन्हा केल्याची कबुली दिली. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी