शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

  प्रेमप्रकरणात अडसर ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 10:59 IST

गणेश सरोजकरला अस्वस्थ वाटू लागले असता त्याचा चौघांनी रुमालाने गळा आवळून खून केला व पार्थिव तेथेच शेतात गाडले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: प्रेमप्रकरणात बाधा ठरत असलेल्या पतीचा प्रियकर व त्याच्या दोन सहकाऱ्यांच्या मदतीने खून करून त्याचा मृतदेह आवळखेड शिवारातील शेतात गाडून टाकल्याप्रकरणी सागवन गायरान शिवारातील एका महिलेसह तिच्या तीन साथीदारांना बुलडाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेच्या तब्बल १५ दिवसानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्यामुळे गायरान परिसरात खळबळ उडाली आहे.बुलडाणा शहरालगतच असलेल्या सागवन गावातंर्गतच्या गायरान परिसरात राहणाºया एका महिलेचे तिच्या घराशेजारीच राहत असलेल्या अनिल सुरूशे नामक व्यक्तीशी प्रेमकरण जुळले होते. दरम्यान त्यांच्या दोघांच्या संबंधामध्ये महिलेचा पती गणेश सरोजकर अडसर ठरत असल्याने त्याचा काटा काढण्याचे त्यांनी ठरवले. त्यासाठी अनिल सुरोशे याने त्याचे महेंद्र खिल्लारे (रा.नांद्राकोळी), अरुण निकाळजे (रा. हतेडी) यांचे सहकार्य घेतले.२५ मे रोजी गणेश सरोजकर यास एका दुचाकीवर बसवून हतेडी येथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे पैसे आणण्यासाठी जावयाचे आहे, असा बहाणा करून त्यांनी आवळखेड शिवारात अरुण निकाळजे याच्या शेतात नेले. तेथे त्याला मद्यामध्ये विषारी औषध पाजले. गणेश सरोजकरला अस्वस्थ वाटू लागले असता त्याचा चौघांनी रुमालाने गळा आवळून खून केला व पार्थिव तेथेच शेतात गाडले.या प्रकरणी सागवन येथील पोलिस पाटील मनिषा समाधान जाधव यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अनिल सुरूशे, दिव्यांग महिला लिला गणेश सरोजकर महेंद्र खिल्लारे आणि अरुण निकाळजे यांना ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.घटनेचा पुढील तपास ठाणेदार प्रदीप साळुंके, कोकीळा तोमर, गजानन लहासे व अन्य पोलिस सहकारी करीत आहेत. गाडलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन४२५ मे रोजी खून करून गणेश सरोजकर याचे पार्थिव चिखला शिवारातील शेतात गाडण्यात आले होते. रात्रीच बिट जमादार कोकिळा तोमर यांच्यासह बुलडाणा शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी चिखला शिवार गाठून घटनास्थळाची पाहणी केली. सोबतच मृत व्यक्तीचे पार्थिव जिल्हा सामान्य रुग्णालयात इनक्वेस्ट पंचनामासाठी आणण्यात आले आहे.

सतत होत होते वादप्रेमसंबंधावून मृतक व त्याच्या पत्नीमध्ये नेहमीच वाद होत होते. त्यातच मृतक हा सराईत गुन्हेगार होता. त्यामुळे त्याच्या विरोधात बुलडाणा पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल होते. प्रकरणी तो आपल्याला व आपल्या प्रियकराला मारून टाकले या भीतीपोटी मृत व्यक्तीच्या पत्नीने प्रियकराला हाताशी धरून गणेश सरोजकरला संपविण्याचा कट आखला होता.या कटाची अंमलबजावणी करण्यास अनिल सुरुशेच्या दोन सहकाºयांनीही त्यास मदत केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी