शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पालिका कर्मचाऱ्यांचे सोमवारपासून आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 16:42 IST

राज्य शासनाच्या निषेधार्थ पालिका कर्मचारी संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:  कोरोना फायटर्स म्हणून अत्यावश्यक सेवा देणाºया सफाई कामगारांचा जीवन विमा राज्य शासनाने उतरविला नाही. त्यामुळे राज्यातील सर्वच पालिका कर्मचारी संतप्त झाले असून राज्य शासनाच्या निषेधार्थ पालिका कर्मचारी संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. उद्या सोमवार २७ एप्रिलपासून सफाई कामगारांसह राज्यातील ३६३ शहरातील पालिका कर्मचारी टप्प्या-टप्प्याने आंदोलन छेडणार आहेत.कोरोना या विषाणू संसर्ग रोखण्यासाठी  आपातकालीन परिस्थितीत राज्यातील सर्वच नगर पालिकेतील विविध संवर्गातील अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कामगार आपल्या जीवाची पर्वा न करता सेवारत आहे. कोरोना फायटर्स  म्हणून सेवारत असलेल्या पालिका कर्मचाºयांना राज्य शासनाकडून सापत्न वागणूक मिळत असल्याच्या निषेधार्थ, कामगार संघटना एकवटल्या आहेत. त्यामुळे सोमवारपासून पालिका कर्मचाºयांच्या जीवन विमा काढण्याच्या आंदोलनाला धार चढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

  जीवन विमा काढण्यास टाळाटाळ!  कोरोना या विषाणू संसर्ग महामारीच्या अनुषंगाने ग्रामविकास, गृहविभाग आणि आरोग्य विभागातील कर्मचाºयांचा वैद्यकीय विमा यापूर्वीच उतरविला आहे. मात्र, गत महिनाभरापासून सफाई कामगाराचा जीवन विमा काढण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. आरोग्य विभागाच्या डॉक्टर व इतर कर्मचारी, पोलिस कर्मचारी आणि ग्रामपंचायत कर्मचाºयांप्रमाणे सफाई कामगार आणि इतर पालिका कर्मचाºयांचा विमा उरविण्याची कर्मचारी संघटनांची मागणी आहे. मात्र, गत महिनाभरापासून पालिका कर्मचाºयांचा जीवन विमा काढण्यास शासनाकडून टाळाटाळ केली जात आहे.

 सफाई कामगार संघटनांचा पाठींबा!पालिका कर्मचाºयांचा जीवन विमा उतरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी, संघटनेने छेडलेल्या आंदोलनाला राज्यातील अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस आणि अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे. यासंदर्भात संबंधित सफाई कामगार संघटनांनी पत्रही दिले आहे. 

 राज्य शासनाने आरोग्य, ग्रामविकास आणि पोलिस कर्मचाºयांचा विमा उरविला आहे. मात्र, पालिका कर्मचाºयांना वगळण्यात आले आहे. पालिका कर्मचाºयांचा विमा काढण्यासाठी गत महिनाभरापासून लढा देत आहोत. मात्र, शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने उद्यापासून टप्प्या टप्प्याने आंदोलन छेडण्यात येत आहे.- विश्वनाथ घुगेराज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी, संघटना, महाराष्ट्र 

टॅग्स :khamgaonखामगावEmployeeकर्मचारी