शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मन प्रकल्पचे कार्यकारी अभियंता मुंदडाच्या जामिनावर आज होणार सुनावणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 02:21 IST

बुलडाणा : जिगाव प्रकल्प निविदा घोटाळा प्रकरणातील आठ आरोपींपैकी एक असलेले मन प्रकल्प कार्यालयाचे कार्यकारी अभियंता आर. जी. मुंदडा यांच्या जामीन अर्जावर सोमवारी खामगाव न्यायालयात सुनावणी होणार आहे.

ठळक मुद्देजिगाव प्रकल्प निविदा घोटाळाआर. जी. मुंदडा हे आठ आरोपींपैकी एक

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिगाव प्रकल्प निविदा घोटाळा प्रकरणातील आठ आरोपींपैकी एक असलेले मन प्रकल्प कार्यालयाचे कार्यकारी अभियंता आर. जी. मुंदडा यांच्या जामीन अर्जावर सोमवारी खामगाव न्यायालयात सुनावणी होणार आहे.दरम्यान, प्रकरणातील दुसरे आरोपी असलेले कार्यकारी अभियंता संजय वाघ यांना २0 नोव्हेंबर रोजी खामगाव न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला होता. त्यांच्या प्रकरणाच्या संदर्भात २ डिसेंबर रोजी सुनावणी असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश पाटील यांनी दिली.जिगाव प्रकल्पाचे २00८ पासून प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. या कामापैकी एका कामामध्ये गैरप्रकार झाल्याप्रकरणी खंडपीठाच्या निर्देशानुसार खामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जिगाव प्रकल्पासंदर्भातील सात अभियंते आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. एसीबीच्या जवळपास नऊ पथकांनी पुणे, नाशिक, यवतमाळ, नांदेडसह अन्य ठिकाणी तपास करून काही कागदपत्रेही जप्त केली होती. दरम्यान,  वाघ आणि मुंदडा यांनी खामगाव न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यात २0 नोव्हेंबर रोजी वाघ यांना तात्पुरता जामीन मिळाला होता. दरम्यान, मुंदडा यांनी ६ नोव्हेंबरला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने १५ नोव्हेंबरला सुनावणी ठेवली होती. पुन्हा ती २0 नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली; मात्र त्या दिवशी त्यावर सुनावणी झाली नाही. ती आता २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सध्या निविदा घोटाळा प्रकरणामुळे जिगाव प्रकल्प चर्चेत आला आहे. 

टॅग्स :Damधरण