शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुंबई बाजार समिती: बुलडाण्याच्या खासदारांनी राखली प्रतिष्ठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 14:51 IST

डॉ.शिंगणे यांना बुलडाण्याचे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर हे शीतयुद्ध आणखीच तीव्र झाल्याच्या पृष्ठभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.

- राजेश शेगोकार

 अकोला : लोकसभा निवडणुकीत विजय मिळविल्यापासून बुलडाण्यात खासदार प्रतापराव जाधव विरुद्ध डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर डॉ.शिंगणे यांना बुलडाण्याचे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर हे शीतयुद्ध आणखीच तीव्र झाल्याच्या पृष्ठभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. या निवडणुकीच्या निमित्ताने खा.जाधव यांनी आपली प्रतिष्ठा कायम ठेवत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर पहिल्यांदाच शिवसेनेचा सदस्य निवडून आणला आहे.वार्षिक हजारो कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकीत अमरावती विभागातील दोन्ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. भाजपला येथे पराभवाचा सामना करावा लागला.यवतमाळचे काँग्रेसचे प्रवीण देशमुख आणि बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरचे शिवसेनेचे माधवराव जाधव विजयी झाले आहेत. माधवराव हे प्रतापराव जाधव यांचे सख्ये बंधु आहेत. त्यांनी प्रथमच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढविली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने माधवराव यांच्या उमेदवारीला विरोध होणार नाही, असा त्यांचा होरा होता; मात्र बुलडाण्याच्या शेगाव येथील पांडुरंगदादा पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून बंडाचा झेंडा फडकविला. पाटील हे यापूर्वी मुंबई कृषी उत्पन्न बाजारवर सदस्य होते. ते डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. राष्टÑवादी काँगे्रसच्या माध्यमातून ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षही राहिले होते, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीमागे डॉ.शिंगणे यांचे पाठबळ आहे, अशीच चर्चा सहकार वर्तुळात होती. त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर ते अर्ज मागे घेतील, ही अपेक्षा फोल ठरली व त्यांनी रिंगणात कायम राहण्याचा निर्णय घेतला. अमरावती विभागातील अवघे दोन उमेदवार विजयी करायचे असल्याने पाटील यांची बंडखोरी सेनेचे उमेदवारी माधवराव जाधव यांना कठीण जाण्याचे संकेत होते, त्यामुळेच या निवडणुकीच्या निमित्ताने खासदार व नामदार अशी लढाई रंगणार, असे संकेत होते. २८ फेब्रुवारीला मतदान पार पडल्यानंतरकोण बाजी मारणार, याची राजकीय चर्चा रंगली होती. त्या पृष्ठभूमीवर माधवराव जाधव यांचा विजय खासदार जाधव यांच्या रणनीतीचा विजय मानला जातो. अमरावती विभागातून यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे प्रवीण देशमुख ४८७ मते घेऊन विजयी झाले. त्यांच्यासोबत महाविकास आघाडीतील शिवसेनेचे माधवराव जाधव ४३७ मतांनी निवडून आले. रिंगणात कायम राहिलेले पांडुरंग पाटील यांना ३४१, गजानन चौधरी ४० तर भाऊराव ढवळे यांना ५ मते मिळाली. सहकारात भाजपची ताकद कमीचसहकार क्षेत्रात बहुतांश काँग्रेस-राष्टÑवादीचेच वर्चस्व आहे. त्यात शिवसेनेची साथ मिळाली. त्यामुळे अमरावती विभागातील संचालकांच्या दोन्ही जागा महाविकास आघाडीने पटकाविल्या. भाजपचे शेगाव येथील गोविंद मिरगे (३६) व पुसदचे दिलीप बेंद्रे (२२) हे दोन्ही उमेदवार पराभूत झाले. त्यांना मिळालेली मते पश्चिम विदर्भातील सहकारात भाजपची खरोखरच ताकद किती आहे, ही बाब अधोरेखित करणारी ठरली आहे

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाPrataprao Jadhavप्रतावराव जाधव