शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादांचे उल्लंघन, सरसंघचालकांनी टोचले राजकीय नेत्यांचे कान...
2
महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणते खाते?; मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंवर मोठी जबाबदारी
3
नवीन सरकारमध्येही PM मोदींची कोअर टीम कायम; देशाची सुरक्षा 'या' मंत्र्यांच्या खांद्यावर...
4
SA vs BAN Live : वर्ल्ड कपमध्ये चाललंय काय? बांगलादेशसमोर आफ्रिकेची ट्वेंटी-२० मध्ये 'कसोटी'
5
Rohit Pawar : "८५ वर्षीय शरद पवारांना, ८५ आमदारांचं गिफ्ट देऊ"; वर्धापनदिनाच्या भाषणात रोहित पवारांनी आकडाच सांगितला
6
नरेंद्र मोदींकडे कुठली खाती, देशाचे कृषी मंत्री कोण?; खातेवाटप जाहीर, वाचा संपूर्ण यादी
7
PHOTOS : विराट कोहलीला प्रपोज करणाऱ्या महिला क्रिकेटपटूचं गर्लफ्रेंडसोबत लग्न
8
मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...
9
Ajit Pawar : वर्धापन कार्यक्रमात अजितदादा शरद पवारांचे नाव घेऊन भावुक; म्हणाले, "२४ वर्ष साहेबांनी पक्षाचं...",
10
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; ३ कोटी लोकांना होणार फायदा
11
काहीजण संपर्कात, योग्यवेळी आमच्यासोबत येतील; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला सूचक इशारा
12
टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ICC कडे सोपवले वेळापत्रक
13
भाजपा मोठा भाऊ मान्य, पण शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात - छगन भुजबळ
14
आमचे 7 खासदार असूनही आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद का नाही? शिंदे गटाने जाहीर केली नाराजी...
15
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त
16
अम्पायरशी भिडणं Matthew Wade च्या अंगलट; ऑस्ट्रेलियन खेळाडूला ICC चा सज्जड दम
17
२८८ मतदारसंघात ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांना आदेश
18
"पक्षाचा आदेश पाळावाच लागणार"; अजितदादांसमोर सुनिल तटकरेंनी मुंडे, मुश्रीफ सगळ्यांनाच सुनावलं
19
भारत-पाक सामन्यानंतर MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन; देवेंद्र फडणवीसांशी होतं जवळचं नातं
20
... तर विधानसभेला काँग्रेसचे सगळे उमेदवार पाडणार; मनोज जरांगे का संतापले?

श्री गणेशाचे आज विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 11:37 PM

मागील १२ दिवसांपासून भक्तांच्या सान्निध्यात असलेल्या श्री गणेशाला निरोप देण्यासाठी विविध गणेश मंडळांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासाठी पोलीस प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली असून, ५ सप्टेंबर रोजी तगडा बंदोबस्त राहणार आहे.

ठळक मुद्देपोलीस प्रशासन सज्ज१५ ड्रोन कॅमेर्‍याने राहणार लक्ष गणेश मंडळांनी केली जय्यत तयारी 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/खामगाव : मागील १२ दिवसांपासून भक्तांच्या सान्निध्यात असलेल्या श्री गणेशाला निरोप देण्यासाठी विविध गणेश मंडळांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासाठी पोलीस प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली असून, ५ सप्टेंबर रोजी तगडा बंदोबस्त राहणार आहे. जिल्ह्यात यावर्षी ९२४ ठिकाणी गणेशाची स्थापना करण्यात आली होती. दरम्यान, गणेश मंडळांनी विविध उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा केला. ५ सप्टेंबर रोजी गणेशाला निरोप देण्यात येणार असल्यामुळे जय्यत तयारी करण्यात आली आहे. बुलडाणा शहरासह जिल्ह्यातील १३ तालुक्यांत तसेच जिल्ह्यातील विविध मोठय़ा शहरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणार्‍या खामगावातील गणेश विसर्जन मिरवणूक सोहळ्याची जय्यत तयारी विविध गणेशोत्सव मंडळांकडून करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन मेहनत घेत असून, मिरवणुकीच्या नियंत्रणाकरिता यंत्रणा सज्ज झाली आहे. मंडळांची मिरवणुकीतील क्रमवारीसुद्धा सोमवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून विसर्जन मिरवणुकीची तयारी पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. विसर्जन मार्गावर आठ ठिकाणी वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. त्यावरून पोलिसांच्यावतीने सुरक्षेच्या दृष्टीने मिरवणुकीचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच ठिकठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात आले असून, त्याठिकाणी आजपासूनच पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मिरवणुकीदरम्यान जागोजागी पोलीस तैनात राहणार आहेत. यावर्षी ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांच्यावतीने विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मिरवणुकीतील वाद्यांची तीव्रता मोजण्यासाठी पोलिसांकडे ध्वनिमापक यंत्र राहणार आहे. वाद्यांच्या आवाजाची र्मयादा ओलांडणार्‍या मंडळांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. बंदोबस्तासाठी विशेष पोलीस कुमक तैनात राहणार आहे. निर्मल टर्निंग ते राणागेट व बोरीपुरा भागात कलम १४४ लागू राहील. मंडळांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात बंदोबस्तासाठी पोलीस अधीक्षक एक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दोन, उपविभागीय पोलीस अधिकारी तीन, पोलीस निरीक्षक ३१, उप पोलीस निरीक्षक १५0, पोलीस कर्मचारी २३८0, होमगार्ड एक हजार, एसआरपी एक कंपनी, दारूबंदीचे सात अधिकारी, २८ कर्मचारी, वन विभागाचे ५0 कर्मचारी तसेच पोलीस मित्रांचा समावेश राहणार आहे.-