शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वाशिम येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या हालचाली ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 13:10 IST

१३ केएल क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या हालचाली आरोग्य व जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

- संतोष वानखडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  कोरोनाचा आलेख घसरत असला तरी दुसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरता आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. ऑक्सिजनअभावी रुग्णांना गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात १३ केएल क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या हालचाली आरोग्य व जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांटची आवश्यकता असल्यासंदर्भात ‘लोकमत’ने यापूर्वी वृत्त प्रकाशित केले होते, हे विशेष.खबरदारीचा उपाय म्हणून अतिजोखीम गटातील रुग्णांना तातडीने ऑक्सिजन उपलब्ध व्हावे याकरीता अकोला येथील प्लांटमधून ऑक्सिजन सिलिंडर मागविण्यात येतात. वाशिम जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट नसल्याने आगामी काळात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आॅक्सिजन प्लांटची मागणी समोर आली. १० आॅक्टोबर रोजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वाशिम येथे ‘आरटी-पीसीआर’ प्रयोगशाळेच्या ई-उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात १३ केएल क्षमतेचा (१० हजार लिटर) लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यात यावा, अशा सूचना जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला दिल्या. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेंतर्गतच्या निधीमधून वाशिम येथे लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या.

लिक्विड ऑक्सिजन प्लांटसंदर्भात आरोग्य मंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार पुढील कार्यवाही वरिष्ठांच्या मार्गदर्शनात केली जात आहे. यापूर्वी जेथे प्लांट उभारण्यात आले, तेथून वर्कऑर्डर मागविण्यात येत आहेत.                - डॉ. मधुकर राठोड  जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या