शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राहुल बोंद्रेंच्या नेतृत्वात शेतकर्‍यांचे आंदोलन; चिखली-मेहकर मार्गाचे काम पाडले बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:35 IST

चिखली: शेतकर्‍यांच्या जमिनी कुठलीही सूचना न देता व जमीन अधिग्रहणाची कार्यवाही न राबविता चालविली असल्याचा आरोप करीत या मार्गावरील शेतकर्‍यांनी आधी जमिनीचा योग्य मोबदला द्या, नंतरच रस्त्याचे काम सुरू करा, अशी भूमिका घेत आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात चिखली-मेहकर रस्ता चौपदरीकरणाचे काम ३0 जानेवारी रोजी बंद पाडले.

ठळक मुद्दे जमिनीचा योग्य मोबदला द्याकुठलीही पूर्व सूचना न देता शेतजमीन खोदकामास सुरुवात केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: शेतकर्‍यांच्या जमिनी कुठलीही सूचना न देता व जमीन अधिग्रहणाची कार्यवाही न राबविता चालविली असल्याचा आरोप करीत या मार्गावरील शेतकर्‍यांनी आधी जमिनीचा योग्य मोबदला द्या, नंतरच रस्त्याचे काम सुरू करा, अशी भूमिका घेत आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात चिखली-मेहकर रस्ता चौपदरीकरणाचे काम ३0 जानेवारी रोजी बंद पाडले.चिखली ते मेहकर रस्त्याचे चौपदरीकरणासाठी प्रशासनाने या रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील शेतकर्‍यांच्या जमिनी कुठलीही पूर्व सूचना न देता व भूसंपदनाची कुठलीही कायदेशीर कार्यवाही पूर्ण न करता शेतजमीन खोदकामास सुरुवात केल्याचा आरोप करीत शेतकर्‍यांनी आ. राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्‍यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार एकलारा, आंबाशी फाट्यावर आ. बोंद्रे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकर्‍यांनी चिखली-मेहकर मार्गाचे काम सकाळी ११ वाजेपासून बंद पाडले.  या आंदोलनात तालुकाध्यक्ष विष्णू पाटील कुळसुंदर, बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, रमेश सुरडकर, ज्ञानेश्‍वर सुरूशे, अशोक पडघान, संजय पांढरे, ज्येष्ठ पत्रकार अनिल पळसकर, पं.स. सदस्य लक्ष्मण आंभोरे, शे. नासेर, रूपराव पाटील, मदन म्हस्के, सुनील म्हस्के, अरविंद झाल्टे, गजानन परिहार, शिवाजी पवार, सचिन बोंद्रे आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भालगाव, कोलारा, मुंगसरी, आमखेड, खैरव, आंबाशी, एकलारा, येथील शेतकरी सहभागी झाले होते. दरम्यान, या रस्त्यात शेत जमिनी जाणार्‍या शेतकर्‍यांशी शासनाचे बोलणे होऊन तोडगा निघाल्याशिवाय रस्त्याचे पुढील काम सुरू करणार नसल्याचे संबंधित कंत्राटदार पवन पाटील यांनी स्पष्ट केले. 

 

टॅग्स :Rahul Bondreराहुल बोंद्रेhighwayमहामार्गbuldhanaबुलडाणा