शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

योग दिनानिमित्त मालेगाव शहरात मोटारसायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 14:22 IST

मालेगव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जनजागृतीचा एक भाग म्हणून पतंजली योग समितीच्यावतीने मालेगाव शहरात २० जून रोजी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देयोगदिनाला उपस्थित राहण्याचा संदेश देण्यासाठी सदर रॅली काढण्यात आली.‘करो योग-रहो निरोग’, भारत माता की जय, जय जवान-जय किसान, वंदे मातरम अशा घोषणा रॅलीमध्ये देण्यात आल्या. गांधी चौक मार्गे मुख्य बाजारपेठमधून सदर रॅलीचा समारोप मातोश्री कॉम्प्लेस येथे करण्यात आला.

मालेगव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जनजागृतीचा एक भाग म्हणून पतंजली योग समितीच्यावतीने मालेगाव शहरात २० जून रोजी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. २१ जून रोजी सकाळी ५.३० वाजता स्थानिक ना.ना. मुंदडा महाविद्यालयांमध्ये भव्य योगा शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. योगदिनाला उपस्थित राहण्याचा संदेश देण्यासाठी सदर रॅली काढण्यात आली. ‘करो योग-रहो निरोग’, भारत माता की जय, जय जवान-जय किसान, वंदे मातरम अशा घोषणा रॅलीमध्ये देण्यात आल्या. गोपाल पाटील राऊत यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यावरून पंचायत समिती मार्गे तहसील कार्यालय, गांधी चौक मार्गे मुख्य बाजारपेठमधून सदर रॅलीचा समारोप मातोश्री कॉम्प्लेस येथे करण्यात आला. रॅलीमध्ये बहुसंख्य योग समिती पदाधिकाºयांची उपस्थिती होती. सर्व योग समितीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मालेगाव शहरातील योग शिबिर हे भव्यदिव्य करण्याचे ठरविले असून त्यामध्ये मालेगाव शहरासह तालुक्यातील सर्व नागरिकांनी सहपरिवार उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान, किसान पंचायत, महिला पतंजली, युवा भारत समिती मालेगावच्या वतीने करण्यात आलेले आहे.या रॅलीमध्ये प्रदेश सदस्य गोपाल पाटील राऊत, विस्तारक रमेश आप्पा खोबरे, जिल्हा सरचिटणीस नितीन काळे, पंचायत समिती सदस्य संजय देशमुख, शहराध्यक्ष तेजस आरू, सुनील काटेकर, हरी लहाने,  पंकज पाध्ये, नामदेव बोरचाटे, मालेगाव तालुका प्रभारी यशवंत जावळे, वसीम पठान, विजय भूरकाडे,  अनिल सोळंके, गणेश कुटे, किरण जिरवणकर,  संतोष तीखे, मधुकर भांडेकर, विनोद कल्याणकर, ज्ञानेश्वर देवळे,  जगदीश देशमुख, अनिल निंबूकार, दर्शन दहात्रे काना दहात्रे, नीलेश वाघमारे, सुधीर डेवसन यांच्यासह पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. रॅलीचा समारोप गोपाल पाटील राऊत यांच्या जनसंपर्क कार्यालयांमध्ये आभार व्यक्त करून करण्यात आला.२१ जून रोजी स्थानिक ना.ना. मुंदडा विद्याालय येथे सकाळी ५.३० वाजता भव्य योग शिबिर घेण्यात येणार आहे . तेथे  प्रशिक्षित शिक्षक योग करुण घेणार आहेत. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :MalegaonमालेगांवYogaयोग