मलकापूर : कापसाच्या उभा ट्रॉलीवर मोटारसायकल आदळून दोघे जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजता दाताळानजीक घडली. सध्या शेतकऱ्यांची कापूस विक्रीस गर्दी दिसत आहे. त्यामुळे सीसीआय केंद्रासह तालुक्यातील अनेक कापूस जिनसमोर कापसाने भरलेली वाहने उभी दिसत आहेत.कापूस ठेवायला जागा नसल्याने कापसाच्या गाड्या रस्त्यावरच उभ्या केल्या जात आहेत. मंगळवारी रात्री साडेदहा वाजता दाताळापासून काही अंतरावर असलेल्या खुपगाव येथील दोघे तिघे मोटारसायकलने घरी जात होते. दरम्यान त्यांची मोटरसायकल गणपती जिल्हाजवळील उभ्या कापसाच्या ट्रॉलीवर आदळली. या अपघातात घटनास्थळावर दोघे जागीच ठार झाले, तर एक जण जखमी झाला. नागरिकांनी धाव घेत जखमी युवकास उपचारार्थ दवाखान्यात हलवले. घटनेतील मृतक व्यक्तींची ओळख रात्री उशिरापर्यंत पटू शकली नाही.
कापसाच्या वाहनावर मोटारसायकल आढळून दोन जागीच ठार; एक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 23:28 IST