शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
3
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
4
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
5
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
6
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
7
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

मोताळा @ ८७.८३ टक्के; निकालात मुलींची आघाडी

By admin | Published: June 14, 2017 12:50 AM

मोताळा तालुक्याचा निकाल एकूण ८७.८३ टक्के लागला आहे. मागील दोन वर्षाच्या तुलनेत यंदा निकालाचा टक्का ५ टक्क्याने घसरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : राज्य माध्य. व उच्च माध्य. शिक्षण मंडळाने मार्च २०१७ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी १३ जून रोजी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. इंटरनेटच्या माध्यमातून मिळालेल्या निकालानुसार मोताळा तालुक्याचा निकाल एकूण ८७.८३ टक्के लागला आहे. मागील दोन वर्षाच्या तुलनेत यंदा निकालाचा टक्का ५ टक्क्याने घसरला आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही मुलांच्या तुलनेत मुलीच आघाडीवर आहेत.मोताळा तालुक्यातील एकूण ३० माध्यमिक विद्यालयातून २ हजार १७० नियमित, तर १३९ रिपीटर्स असे एकूण २ हजार ३०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये नियमित १ हजार ९०६ तर रिपिटर्सपैकी ७३ असे एकूण १ हजार ९७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. नियमीत मुला-मुलींची टक्केवारी ८७.८३ टक्के असून, रिपिटर्सची टक्केवारी ५२.५२ टक्के आली आहे. नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये १ हजार ३७ विद्यार्थी तर ८६९ विद्यार्थीनींचा समावेश आहे. यात मुलांची टक्केवारी ८५.२८ तर मुलींची टक्केवारी ९१.०९ इतकी आली आहे. शहरातील स्व.बबनराव देशपांडे विद्यालय मोताळा ८१.९७ टक्के, कुसूमावती भीमराव जाधव नॉलेज हब बोराखेडी ८७.५० टक्के, जिजामाता कन्या विद्यालय मोताळा ८८.०९ टक्के, जवाहर उर्दू हायस्कूल मोताळा ९८.६८ टक्के, एम.ई.एस.हायस्कूल धामणगाव बढे ९७.५३ टक्के, एडेड ई एस.हायस्कू ल शेलगाव बाजार ८३.३३ टक्के, भिकमराव एस.देशमुख विद्यालय पोफळी ८६.४० टक्के, श्री जगदंबा विद्यालय लिहा बु: ९६.४९ टक्के, जनता हायस्कूल तळनी ७० टक्के, श्री अनंतराव सराफ विद्यालय शेलापूर बु: ८५.८१ टक्के, जनता हायस्कूल कोथळी ८२.२९ टक्के, नवजीवन विद्यालय रोहिणखेड ८३.९१ टक्के, जिल्हा परिषद हायस्कूल पान्हेरा(खेडी) १०० टक्के, तिरूपती बालाजी विद्यालय कोऱ्हाळा बाजार ८४.६१ टक्के, शरद पवार विद्यालय सारोळा मारोती ९५ टक्के, सरस्वती माध्य विद्यालय डिडोळा बु: ९५.७४ टक्के, छत्रपती शिवाजी विद्यालय सिंदखेड लपाली ८२.६० टक्के, रेणुकादेवी माध्य विद्यालय राजूर ७१.०५ टक्के, नॅशनल उर्दू हायस्कु ल रोहिणखेड १०० टक्के, डॉ.जाकिर हुसैन उर्दू हायस्कूल धामणगाव बढे १०० टक्के, राजे छत्रपती विद्यालय जयपूर ९०.१९ टक्के, कुलस्वामिनी माध्य. विद्यालय पिंपळगाव देवी ८४.२१ टक्के, समता हायस्कूल तरोडा ८८.३७ टक्के, कर्मवीर भिकमसिंह पाटील माध्य. विद्यालय निपाना ८१.८१ टक्के, श्री.चांगदेव विद्यालय उबाळखेड १०० टक्के, राष्ट्रीय माध्य विद्यालय पिंप्रीगवळी ७६.७४ टक्के, शासकिय माध्यमिक आश्रम शाळा तरोडा ८५ टक्के, एच.एस. खान उर्दू हायस्कूल राजूर १०० टक्के, चांदबी उर्दू हायस्कूल कोथळी ९७.२९ टक्के व सहकार विद्या मंदीर धा. बढे शाळेचा १०० टक्के निकाल लागला आहे. यंदाच्या निकालामध्ये ४१९ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य प्राप्त केले असून, प्रथम श्रेणीमध्ये ९२१ तर द्वितिय श्रेणीमध्ये ५२३ विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. गुणपडताळणी अर्ज करण्याची सोय उपलब्धविद्यार्थ्यांना गुणपडताळणी व छायप्रतीसाठी मंडळाच्या संकेतस्थळावर विहीत शुल्क भरून अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुणपडताळणीसाठी बुधवार १४ मे ते २३ मे तर छायाप्रतीसाठी १४ मे ते ३ जुलै २०१७ पर्यंत विहीत शुल्क भरून अर्ज करता येईल. उत्तर पत्रिकांचे पुनर्मूल्यांक नासाठी प्रथम छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. मंडळाला छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून कार्यालयीन कामकाजाचे पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित शुल्क भरून मंडळाकडे अर्ज करणे आवश्यक आहे.