शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

लोणार तालुक्यातील जलाशयांनी गाठला तळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 01:50 IST

लोणार : मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा झाल्याने लोणार तालुक्यातील बोरखेडी धरणात गाळच शिल्लक राहिला आहे. यामुळे शहरात भीषण पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. तालुक्यातील अनेक जलाशयात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे

ठळक मुद्देबोरखेडी धरणात उरला केवळ गाळ भीषण पाणीटंचाईचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : तालुक्यातील बोरखेडी धरणात अत्यल्प पाणी साठा उपलब्ध असल्यामुळे जिल्हाधिका-यांच्या आदेशान्वये तलावातील सुरू असलेला अवैध पाणी उपसा बंद करण्याबाबत तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. विद्युत पुरवठा खंडित केलेला असताना पाणी उपसा करणा-यावर नोव्हेंबर महिन्यात मोठी कारवाई करण्यात आली; मात्र मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा झाल्याने धरणात गाळच शिल्लक राहिला आहे. यामुळे शहरात भीषण पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. ग्रामीण व शहरी भागात पाणी पुरवठा करणाºया अनेक जलाशयात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नोव्हेंबर २०१७ रोजी अवैध पाणी उपसा टाळता यावा, त्यानुषंगाने  जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सन २०१६-१७ मध्ये तालुकानिहाय पथक स्थापन करण्यात आले होते. सदर पथकाने पाणी पुरवठा करणाºया जलाशयातील होत असलेला अवैध पाणी उपसा बंद करण्याच्या दृष्टीने विद्युत मोटारी जप्त करून वीज पुरवठा तोडण्याबाबत शीघ्र कारवाई करावी, असे आदेश असताना बोरखेडी धरणातून अवैध पाणी होत राहिल्याने नगर परिषद कार्यालयाने ६ डिसेंबर २०१६ रोजी लोणार तहसील कार्यालयात सदर अवैध पाणी उपसा थांबविण्यासाठी कारवाई करण्यात यावी, याबाबत पत्रव्यवहार केला होता; परंतु बोरखेडी धरणातील पाणी उपशावर प्रशासनाने तातडीने ठोस कारवाई न केल्यामुळे शहरवासियांना महिन्यातून केवळ दोन वेळा पाणी मिळत आहे. अनेक जलाशयांनी तळ गाठल्यामुळे प्रशासनाला टँकर सुरू करण्याशिवाय पर्याय उरला नाही. 

नियोजनाचा अभावबोरखेडी धरणातील अत्यल्प पाणी साठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात यावा, असे जिल्हाधिकारी यांचे आदेश असताना उपलब्ध पाण्याचे नियोजन न केल्यामुळे लोणार शहराला भीषण पिण्याच्या पाण्याची टंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या नियोजनाअभावी हा प्रकार निर्माण झाल्याने शहरवासीयांमध्ये रोष निर्माण होत  आहे.

शहरवासियांना पाणी टंचाईतून दिलासा देण्यासाठी लवकर बोअर अधिग्रहण करण्यात येतील. तसेच काही ठिकाणी  टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.- भूषण मापारी , नगराध्यक्ष, लोणार

चार गावांसाठी टँकर मंजूरबुलडाणा :  सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा, शेगाव तालुक्यातील गव्हाण व  चिखली  तालुक्यातील पळसखेड सपकाळ, धोडप येथील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता या चार गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे.  किनगाव राजा गावाची लोकसंख्या ५ हजार ५५० असून, येथे दोन टँकर दररोज एक लक्ष ४५ हजार लिटर पाणी पुरवठा करणार आहे, तसेच गव्हाण गावची लोकसंख्या १७०० असून, येथे एक टँकर मंजूर आहे. त्याचप्रमाणे चिखली तालुक्यातील पळसखेड सपकाळ गावची लोकसंख्या ७०० आहे. या गावासाठी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. धोडप येथील १६०० लोकसंख्येकरिता एक टँकर दररोज ३८ हजार लिटर पाण्याचा पुरवठा करणार आहे.  या सर्व टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीला घेण्यात येणार असून, नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकाºयांनी करावी, निविदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.

टॅग्स :Lonarलोणारwater scarcityपाणी टंचाई