शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर तालुक्यातील ‘रोहयो’ कामगारांच्या खात्यातून पैसे गायब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 23:58 IST

मलकापूर : विदर्भाच्या प्रवेशद्वारी वसलेल्या मलकापूर तालुक्यातील रोजगार हमी योजनेत काम करणार्‍या अनेक कामगारांच्या भारतीय स्टेट बँकेतील खात्यातून जमा झालेली रक्कम अचानक गायब झाली. 

ठळक मुद्देतक्रार : जिल्हाधिकार्‍यांसोबत चर्चापोलीस अधीक्षक करणार चौकशी

हनुमान जगताप। लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : विदर्भाच्या प्रवेशद्वारी वसलेल्या मलकापूर तालुक्यातील रोजगार हमी योजनेत काम करणार्‍या अनेक कामगारांच्या भारतीय स्टेट बँकेतील खात्यातून जमा झालेली रक्कम अचानक गायब झाली. दोन आठवड्यातच आधार कार्ड लिंक केल्यावर ती रक्कम शून्य बॅलन्स झाल्याचा धक्कादायक प्रकार येथे उघडकीस आला आहे. या विषयाला दुजोरा देत जिराकाँ सरचिटणीस संतोष रायपुरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाल्याच सांगून चौकशीची मागणी केली आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी, की केंद्र शासनाच्या आवाहनानुसार देशभरातील गोरगरिबांनी जनधन योजनेत राष्ट्रीयीकृत बँकेत आपली खाती उघडली आहेत. शासनाच्या विविध योजनांचा विविध योजनांचा सरळ लाभ व्हावा, हा त्यामागील उद्देश. त्याच मलकापूर तालुक्यात मौजे हरसोडा शिवारात रोजगार हमी योजनेत काम करणार्‍या असंख्य मजुरांनीही त्यांची खाती राष्ट्रीयीकृत बँकेत उघडली आहेत. विविध लाभांची त्यांनादेखील प्रतीक्षा आहे. असंख्य खातेदारांपैकी एक असलेले अरुण रामचंद्र झाल्टे यांनीदेखील भारतीय स्टेट बँकेत खाते उघडले. त्यांच्या ३२९१७९९४५६२ या नंबरच्या खात्यात १५ नोव्हेंबर २0१७ रोजी काही पैसे जमा झाले. त्यांनी  काही रकमेचा विड्रॉल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या खात्याशी आधार कार्ड लिंक केले. दोन आठवड्यांनंतर त्यांच्या खात्यातील जमा असलेली ९९ हजार ९९९ रुपयांची रक्कम डिलिट झाल्याच २८ नोव्हेंबर रोजी उघड झाले.  एटीएममध्ये विड्रॉल करण्यासाठी २ डिसेंबर रोजी अरुण झाल्टे गेले असता त्यांच्या खात्यात बॅलन्सच नाही, अशी पावती त्यांना मिळाली. मलकापूर तालुक्यात एक नव्हे असंख्य मजुरांसोबत हा प्रकार घडला. या माहितीस जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संतोष रायपुरे यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी ६ डिसेंबर रोजी बुलडाण्याचे जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याशी या विषयावर चर्चा झाल्याच सांगितले, तर जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना चौकशीच्या सूचना देण्याची हमी घेतल्याची माहितीही रायपुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.या विषयावर बँकेशी संवाद साधण्याचा प्रयत्न प्रस्तुत प्रतिनिधीने केला; मात्र तो होऊ शकला नाही. मुद्दा असा की, एखाद्या जनसामान्य मजुराच्या खात्यात पैसा कुठून येतो व कसा येतो आणि आधार कार्ड लिंक केल्यावर गायब होतो. हा धक्कादायक प्रकार एक नव्हे, अनेकांसोबत घडल्याचे वास्तव मलकापुरात उघडकीस आले असून, तूर्तास खात्यात पैसा येऊन गायब झाल्याने त्या असंख्य मजुरांच्या आनंदावर विरजण पडल्याचे वास्तव आहे. 

टॅग्स :bankबँकMONEYपैसा