शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

दोन शाळकरी मुलींचा विनयभंग; एकास सहा महिन्यांची कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 14:32 IST

दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने शिरपूर येथील एकास सहा महिने साधी कैद व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शाळेतून शीव रस्त्याने जात असलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने शिरपूर येथील एकास सहा महिने साधी कैद व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दरम्यान दंड न भरल्यास १५ दिवासांची साधी कैद अशी तरतूद शिक्षेत करण्यात आली आहे.बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गतचा हा महत्त्वपूर्ण निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने २० जून रोजी सुनावला. बुलडाणा तालुक्यातील रायपूर पोलिस स्टेशन अंतर्गत पाच फेब्रुवारी २०१८ रोजी हे प्रकरण घडले होते. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर पीडित मुलगी व तिची बहिण ही शीव रस्त्याने घरी परत असताना शिरपूर येथील आरोपी कुणाल गवई याने अर्धनग्न अवस्थेत या अल्पवयीन मुलींचा पाठलाग केला व त्यांना पाहून अश्लिल हावभाव केले होते. अशा आशयाची तक्रार पीडित मुलीने रायपूर पोलिस ठाण्यात सहा फेब्रुवारी २०१८ रोजी केली होती. त्यानुषंगाने संबंधित तक्रारीची चौकशी करण्यास येऊन आरोपीस अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती पोलिसांनी दोषारोपपत्र बुलडाणा न्यायालयात दाखल केले होते.प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान एकूण सात साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यात अल्पवयीन पीडित मुलगी व तिच्या बहिणीची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. दरम्यान इतर साक्षीदार व पीडित मुलीच्या शाळा मुख्याध्यापकांची जन्मतारखेच्या अनुषंगाने नोंदविण्यात आलेली साक्ष तसेच तपास अधिकारी यांची साक्ष तपासाच्या अनुषंगाने या प्रकरणात सुसंगत व महत्त्वपूर्ण ठरली.त्या आधारावर वादी पक्षातर्फे अ‍ॅड. सोनाली सावजी देशपांडे यांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. के. महाजन यांच्या समोर बाजू मांडली होती. सोबतच आरोपी कुणाल गवई यास जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी न्यायालयात केली. दरम्यान, प्रकरणात आरोपीचे वय २१ वर्षापेक्षा कमी असल्या कारणाने त्याला शिक्षा सुनावण्यापूर्वी आरोपीच्या एकंदरीत वर्तणुकीबाबत न्यायालयामार्फत परीविक्षा अधिकारी (प्रोबेशन आॅफीसर) यांच्याकडून अहवाल ही मागविण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण प्रकरणातील साक्षीपुरावे व निवाडे ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी कुणाल गवई यास बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ च्या कलम ११(४) अतंर्गत दोषी ठरवत शिक्षा सुनावली.या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक सय्यद जलालउद्दीन यांनी केला तर प्रकरणात पैरवी म्हणून सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश लोखंडे यांनी चांगल्या प्रकारे साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यास मदत केली.महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्याच्या दृष्टीने हा निकाल जिल्हयाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण म्हणावा लागले.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाMolestationविनयभंगCourtन्यायालय