शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

समाजमाध्यमावर ओळखीतून युवतीचे शोषण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; वडिलांकडे मागितली होती रक्कम

By सदानंद सिरसाट | Updated: May 17, 2024 19:10 IST

याप्रकरणी युवतीच्या वडिलांनी शेगाव शहर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यामध्ये युवतीचे बी.कॉम.पर्यंत शिक्षण झाले. ती नोकरीनिमित्त पुणे येथे गेली होती.

शेगाव (बुलढाणा) : तालुक्यातील एका गावातील २४ वर्षीय युवतीसोबत समाजमाध्यमावर ओळख करून घेत तिचे शोषण केले. मनाविरुद्ध वागली तर अश्लील फोटो व्हिडीओ व्हायरल करून जीवे मारून टाकण्याची धमकी देणाऱ्या संभाजीनगर जिल्ह्यातील एका युवकासह त्याच्या चार ते पाच सहकारी मित्रांविरुद्ध शेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याप्रकरणी युवतीच्या वडिलांनी शेगाव शहर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यामध्ये युवतीचे बी.कॉम.पर्यंत शिक्षण झाले. ती नोकरीनिमित्त पुणे येथे गेली होती. तेथे सचिन साहेबराव जोगदंडे (२८, रा. चिचोली, ता. फुलंब्री, जि. संभाजीनगर) याने तिच्यासोबत समाजमाध्यमावर मैत्री केली. त्याच्याबाबत संपूर्ण खोटी माहिती देत जाळ्यात अडकविले. तसेच संबंध प्रस्थापित केले. त्यावेळी मुलीचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ नकळत बनवले. त्यामध्ये कॉम्युटरच्या साह्याने दुरुस्ती करून ते मुलीच्या नातेवाइकांमध्ये व्हायरल करेल, अशा धमक्या देत तिला ब्लॅकमेल केले. वेळोवेळी मारहाण केली. त्यामुळे पीडित मुलगी दबावात त्याच्यासोबत राहत होती.आरोपीसोबत त्याचे तीन ते चार मित्रही त्याला सहकार्य करीत आहेत. ९ मे रोजी आरोपीने फिर्यादीला फोन करून मुलगी हवी असेल तर दोन लाख रुपये आणून दे, अन्यथा, फोटो व व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी दिली. यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३८५ नुसार गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सपकाळे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस