संग्रामपूर : शेतात कामाला आलेल्या ५२ वर्षीय महिलेचा शेतमालकाने विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील सोगोडा शिवारात ५ मे रोजी घडली. याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरुन सोनाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सोगोडा येथील ५२ वर्षीय महिलेने सोनाळा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली, की सोगोडा येथील जगन्नाथ श्रीराम भगत (वय ५0) यांचे सोनाळा शिवारात शेत आहे. ५ मे रोजी जगन्नाथ भगत यांनी शेतात कामाला बोलाविले होते. शेतात कामाला आल्यानंतर जगन्नाथ भगत यांनी २00 रुपये दाखवत विनयभंग केला. अशा आशयाची फिर्याद महिलेने ५ मे रोजी दिली. या फिर्यादीवरुन सोनाळा पोलिसांनी जगन्नाथ श्रीराम भगत यांचेविरुद्ध कलम ३५४ (अ) भादंविनुसार गुन्हा दाखल करुन अटक केली. १९ वर्षीय युवतीचा विनयभंगअमडापूर जवळच असलेल्या धोत्रा भनगोजी येथील एका १९ वर्षीय युवतीचा विनयभंग झाल्याची घटना ६ मे रोजी घडली. या प्रकरणी युवतीने दिलेल्या तक्रारीवरून धोत्रा भनगोजी येथील मोहन तुळशिदास उकर्डे (वय ३0) या आरोपीविरुद्ध कलम ४५२, ३५४, ५0६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास ठाणेदार गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राजेश गवई करीत आहेत.
शेतात कामाला आलेल्या मजूर महिलेचा विनयभंग
By admin | Updated: May 8, 2017 02:28 IST