शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

डोणगाव येथे मोबाइलचे दुकान फोडून  २0 हजारांचा माल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:24 IST

डोणगाव : परिसरात ११ फेब्रुवारीला गारपिटीमुळे व वार्‍यामुळे रात्रभर डोणगाव येथील विद्युत बंद असल्याचा फायदा घेत डोणगाव येथील राज्य महामार्गावर असणारी कैलास मोबाइल शॉपी अज्ञात चोरट्यांनी फोडून २0 हजाराचा माल व मोबाइल व्हाऊचर लंपास केल्याची घटना घडली. 

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : परिसरात ११ फेब्रुवारीला गारपिटीमुळे व वार्‍यामुळे रात्रभर डोणगाव येथील विद्युत बंद असल्याचा फायदा घेत डोणगाव येथील राज्य महामार्गावर असणारी कैलास मोबाइल शॉपी अज्ञात चोरट्यांनी फोडून २0 हजाराचा माल व मोबाइल व्हाऊचर लंपास केल्याची घटना घडली. डोणगाव येथे राज्य महामार्गालगत कैलास बोडखे यांचे कैलास मोबाइलचे दुकान असून, ११ फेब्रुवारीला रात्री दुकान बंद करून ते घरी गेले व रात्रभर डोणगावचा विद्युत पुरवठा बंद असल्याचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेत ११ फेब्रुवारीच्या मध्यरात्री दरम्यान बोडखे यांच्या मोबाइलच्या दुकानावरील पत्रा कापून चोरट्याने आत प्रवेश करून दुकानात असलेले मोबाइल व व्हाऊचर अंदाजे २0 हजार ४00 रुपयांचे चोरून नेले. सदर घटना १२ फेब्रुवारी रोजी सकाळी दुकान उघडल्यानंतर लक्षात आली. या अगोदरही चोरट्यांनी हेच मोबाइल दुकान फोडून चोरी केली होती. कैलास बोडखे यांच्या तक्रारीवरून डोणगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात  आली असून, पुढील तपास पोहेकाँ अरूण खनपटे, काकड, विष्णू जायभाये करीत आहेत. 

मोताळा : चोरट्यांनी किराणा दुकान फोडले!तालुक्यातील तालखेड येथे अज्ञात चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री किराणा दुकान फोडून २६ हजार रुपये नगदी तर शेलापूर येथील एक दुचाकी लंपास केली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मधुकर वामन चोपडे रा. तालखेड यांचे गावात घर असून, घरालगतच किराणा दुकान आहे. रविवारी रात्री  दोन अज्ञात चोरट्यांनी दुकानातील नगदी २६ हजारांची रक्कम लंपास केली. चोपडे कुटुंबियांना या प्रकाराची भनक लागताच त्यांनी आरडाओरड केल्यामुळे चोरट्यांनी शेतशिवाराकडे पळ काढला. दरम्यान, याच रात्री शेलापूर येथील प्रवीण सुखदेव आमटे यांच्या घरासमोर उभी असलेली होंडा टीव्हीएस स्टार दुचाकी (क्रमांक एम.एच. २८ वाय. 0५३७) चोरट्यांनी लंपास केली. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाThiefचोर