शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मनसेचे जि. प. समोर अर्धनग्न आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 11:01 IST

Buldhana News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर १० ऑगस्ट रोजी अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून जीवित हानीही होत आहे. अनेकांना रस्ते अपघातामुळे अपंगत्व आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील रस्त्यांची त्वरित दुरुस्ती ककरण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर १० ऑगस्ट रोजी अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.ग्रामीण रस्त्यांच्या दुरवस्थेसाठी जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार असल्याचा ठपकाही मनसेच्या आंदोलकांनी ठेवला आहे. या प्रश्नी वारंवार निवेदने देऊनही जिल्हा परिषद प्रशासनाकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे मनसेने हे आंदोलनात्मक पाऊल उचलले आहे. बुलडाणा जिल्ह्यात जवळपास दोन हजार किमी लांबीचे ग्रामीण रस्ते आहेत. त्यापैकी जवळपास निम्मे रस्ते खराब झालेले आहेत. त्यांची त्वरेने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे यावेळी करण्यात आली. जि. प. च्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे जिल्हा प्रमुख मदन राजे गायकवाड यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील मनसेचे तालुकाध्यक्ष गजानन टेकाळे, शहराध्यक्ष मनोज पवार, शहर उपाध्यक्ष अनिल माेरे, योगेश विसपुते, अंकित मिसाळ, विजय पडोळ, राहूल चौधरी, उमेश नाटेकर, प्रेम सोनोने, बाळराजे देशमुख, राजु मान्टे, गजानन टेकाळे, शिवचरण खोंड, अनिल वाघमारे यांच्यासह अन्य सहभागी झाले होते. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा बाजीही केली. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांना निवेदन देऊन या प्रश्नी चर्चाही करण्यात आली.

टॅग्स :MNSमनसेbuldhanaबुलडाणा