शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पोफळीत वृक्ष लागवडीचा ‘मियावाकी’ पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 14:40 IST

पोफळी ग्रामस्थांनी यावर्षी वृक्ष लागवडीचा मियावाकी पॅटर्न अवलंबिला आहे.

-  नवीन मोदे  लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव बढे : सत्यमेव जयते वॉटर स्पर्धेत गावकऱ्यांच्या एकीतून प्रचंड काम करणाºया मोताळा तालुर्कयातील पोफळी ग्रामस्थांनी यावर्षी वृक्ष लागवडीचा मियावाकी पॅटर्न अवलंबिला आहे. जलदगतीने घनदाट जंगल निर्मितीची ही जपानची पध्दत आहे. जिल्ह्यातील पहिला व देशातील ३८ वा प्रयोग आहे.पाणीटंचाई व दुष्काळाला कायमस्वरुपी हद्दपार करण्यासाठी पोफळीवासी एकत्र आले. वॉटरकप स्पर्धेत विदर्भातील सर्वात जास्त टार्गेट घेऊन त्यापेक्षा अधिक काम करण्याचा भीम पराक्रम त्यांनी केला. पहिल्याच पावसात परिसर पाणीदार झाला. २६ जून रोजी पहिला पाऊस पडताच वृक्ष लागवडीचा मियावाली पॅटर्न राबविण्यात आला. मागील तीन महिन्यांपासून तयारी सुरु होती. गावानजिकच्या सुमारे साडेतीन गुंठा जागेत विविध प्रकारच्या तीन हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले. सामाजिक वनीकरणचे उपसंचालक संजय पार्डीकर, वनाधिकारी पडोळकर उपस्थित होते. पोफळीचे सुपुत्र नीलेश व्यवहारे यांनी स्वखर्चाने हा उपक्रम राबविला. पारंपारिक पध्दतीने जंगल निर्मितीसाठी सुमारे २०० वर्षांचा कालावधी लागतो. परंतू मियावली पध्दतीने केवळ २० वर्षात घनदाट जंगल तयार होऊ शकते. या पध्दतीचा ७० ते ८० च्या दशकात जपानमध्ये उदय व प्रसार झाला. वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. अकिरा मियावाली यांनी या पॅटर्नचे संशोधन केले. जागतिक हवामान बदलास सामोरे जाण्यासाठी मियावाली जंगलनिर्मिती हा उत्कृष्ट पर्याय आहे.प्रयोगातून येणार सकारात्मक परिणाम पोफळीवासियांनी हा अनोखा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला. उद्योजक नीलेश व्यवहारे, अ‍ॅड. राहुल व्यवहारे, पं. स. सदस्य रावसाहेब देशमुख, प्रताप देशमुख, उपसरपंच विशाल व्यवहारे, प्रसन्ना देशमुख, योगेश वसतकार यांनी पुढाकार घेतला. पाणी फाऊंडेशन, कृषी विभाग, वनविभागाचे मार्गदर्शन मिळाले. हा प्रयोग यशस्वी झाल्यास जिल्ह्यात सकारात्मक परिणाम दिसतील. पारंपारिक वृक्ष लागवड पध्दतीऐवजी अशा प्रकारच्या नवीन पध्दतीकडे वळण्याची गरज आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाenvironmentवातावरण