शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचा उडीद खरेदी घोटाळा : बुलडाणा येथील खरेदी-विक्री कार्यालयाला ‘सील’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 01:30 IST

चिखली: येथील कोट्यवधीच्या उडीद खरेदी घोटाळय़ाचे बुलडाणा येथील नाफेड खरेदी केंद्राशी कनेक्शन असल्याची बातमी ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने गंभीरतेने दखल घेत घोटाळय़ाच्या सखोल चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी बुधवारी धडक कारवाई करीत बुलडाणा येथील खरेदी-विक्रीचे कार्यालय सील केले. सोबतच बीजोत्पादक कंपन्यांकडूनही शेतकर्‍यांच्या याद्या मागविल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांची धडक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: येथील कोट्यवधीच्या उडीद खरेदी घोटाळय़ाचे बुलडाणा येथील नाफेड खरेदी केंद्राशी कनेक्शन असल्याची बातमी ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने गंभीरतेने दखल घेत घोटाळय़ाच्या सखोल चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी बुधवारी धडक कारवाई करीत बुलडाणा येथील खरेदी-विक्रीचे कार्यालय सील केले. सोबतच बीजोत्पादक कंपन्यांकडूनही शेतकर्‍यांच्या याद्या मागविल्या आहेत. यानुषंगाने गठित चौकशी समितीने १७ जानेवारी रोजी बुलडाणा खरेदी-विक्रीच्या कार्यालयास सील ठोकले असून, सर्व रेकॉर्ड जप्त केले आहे. तसेच अकोला येथील बीज प्रमाणीकरच्या अधिकार्‍यांकडून प्लॉटचे बियाणे घेतलेल्या शेतकर्‍यांच्या याद्याही मागविण्यात आल्या आहेत.

चिखली येथील नाफेड अंतर्गत झालेल्या उडीद खरेदी घोटाळय़ाच्या चौकशीला सुरुवात झाल्यानंतर या घोटाळय़ाचे कनेक्शन बुलडाणा खरेदी केंद्राशी असल्याची बाब १६ जानेवारीच्या वृत्तात लोकमतने प्रकाशित केली होती. दरम्यान, घोटाळय़ात चिखली केंद्राप्रमाणेच बुलडाणा केंद्रातही खरेदीत घोटाळा झालेला असल्याने जिल्हा उपनिबंधकांनी १६ जानेवारी रोजी दुपारपासून खरेदी-विक्री व्यवस्थापकाकडे माहिती मागितली.  त्यांनी काहीच प्रतिसाद न दिल्याने नानासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी समितीने सायंकाळी सात वाजता खरेदी- विक्रीच्या कार्यालयाला सील ठोकले.  १७ जानेवारीला त्या कार्यालयात जाऊन संपूर्ण रेकॉर्ड ताब्यात घेतले. महाबीज व इतर खासगी कंपन्यांनी त्यांच्याकडून बियाणे घेणार्‍या शेतकर्‍यांच्या याद्या चौकशी समितीने मागवल्या आहेत. राष्ट्रीय बीज उत्पादन कंपनीने याद्या न दिल्याने चौकशीत अडचणी येत आहे. डीडीआर नानासाहेब चव्हाण यांनी राष्ट्रीय बीज उत्पादन कंपनीचे अकोला येथील बीज प्रमाणीकरण अधिकार्‍यांना पत्न देऊन याद्या मागविल्या आहेत. 

दोषींवर कारवाई आवश्यक; मात्र सामान्य शेतकर्‍यांना चुकारेही मिळावे - तुपकरउडीद खरेदी घोटाळय़ाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीवरून सध्या चौकशी सुरू आहे; मात्र यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत आतापर्यंत खरेदी करण्यात आलेल्या उडिदाचे पेमेंट नाफेडने थांबविले आहे. यामध्ये ज्या सामान्य शेतकर्‍यांनी आपल्या शेतातील उडीद विक्री केला त्यांचेही पेमेंट थांबविण्यात आले आहे. या बाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी संबंधित अधिकार्‍यांना पत्न देऊन सामान्य शेतकर्‍यांना पेमेंट थांबवू नका; मात्न ज्या व्यापार्‍यांनी व दलालांनी शेतकर्‍यांचे परस्पर सात-बारे घेऊन त्यांच्या नावावर उडीद विक्री करून शेतकरी तसेच शासनाची फसवणूक केली अशांना सोडू नका, असे म्हटले.

चिखलीतही धडक कारवाई गरजेचीनाफेडच्या उडीद खरेदीत चिखली केंद्रावर सर्वाधिक घोटाळा झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बुलडाण्याप्रमाणेच चिखली येथेही धडक कारवाई होणे गरजेचे आहे.

उडीद खरेदीच्या चौकशीनंतर ज्या शेतकर्‍यांच्या ७/१२ व इतर उतार्‍यांवर उडिदाची विक्री झाली आहे. त्या शेतकर्‍यांवरदेखील कारवाई होऊ शकते. यामध्ये अनेक शेतकर्‍यांचा ७/१२ व्यापार्‍यांनी परस्पर वापरून त्यावर उडिदाची विक्री केली आहे. त्यामुळे ज्या शेतकर्‍यांच्या ७/१२ उतार्‍यांचा गैरवापर झाला आहे. अशा शेतकर्‍यांनी पुढे येऊन माहिती दिल्यास त्यांवरील कारवाई शिथिल करण्यात येईल व दोषींवर कारवाई केल्या जाईल.- नानासाहेब चव्हाणजिल्हा उपनिबंधक, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणा