शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘अहो, इकडे साहेब आहेत का, साहेब’? गैरहजर कर्मचाऱ्याने आवाज देत मारल्या कार्यालयाच्या चकरा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 18:00 IST

‘अहो, इकडे साहेब आहेत का, साहेब’? असा आवाज मेहकर तहसील कार्यालय परिसरात बराच वेळ घुमला. त्यामुळे या आवाजाकडे तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यांसह नागरिकांचे लक्ष वेधले होते.

मेहकर -  ‘अहो, इकडे साहेब आहेत का, साहेब’? असा आवाज मेहकर तहसील कार्यालय परिसरात बराच वेळ घुमला. त्यामुळे या आवाजाकडे तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यांसह नागरिकांचे लक्ष वेधले होते. तहसील कार्यालयातील आवक-जावक विभागातील कनिष्ठ लिपिक कधीच जागेवर राहत नसल्यामुळे  त्रस्त झालेल्या एका नागरिकाने बुधवारी त्या कर्मचा-याच्या टेबलवरील नावाची पाटी चक्क डोक्यावर घेऊन कर्मचा-यांच्या नावाने आवाज देत देत संपूर्ण तहसीलला चकरा मारल्या. मेहकर तहसीलमध्ये दररोज असंख्य नागरिक आपल्या महसूलच्या कामानिमित्त येत असतात. यामध्ये महिला, पुरुष, तरुण वर्गासह वृद्धांचा सुद्धा समावेश असतो. शेतीशी निगडीत कामे, खरेदी-विक्रीचे व्यवहार, फेरफार उतारा यासारख्या असंख्य कामासाठी नागरिक येत असतात.  अधिकारी व कर्मचारी आपल्या जागेवर उपस्थित राहत नसतील तर अनेक कामांचा खोळंबा होतो. कर्मचाºयांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता, पाच मिनिट बसा आलोच, अशी उत्तरे दिली जातात. नागरिकांना मात्र यामध्ये ताटकळत बसावे लागते. मेहकर तहसील कार्यालयात सारशिव येथील मनीष दादाराव जाधव हे निवेदन देण्यासाठी आवक-जावक विभागात दोन तासापासून कनिष्ठ लिपिक  आर. व्ही. शिंदे यांच्या कक्षात बसले होते.  मात्र शिंदे यांचा कुठेच पत्ता नव्हता. इतर विभागाचे कर्मचारी सुद्धा आवक-जावक विभागात पत्रव्यवहार देण्यासाठी येत होते. ते सुद्धा तसेच रिकाम्या हाताने परत जात होते.आजूबाजूला चौकशी केली असता शिंदे आता येतीलच असे उत्तर त्यांना देण्यात येत होते. शेवटी कंटाळून मनीष जाधव यांनी शिंदे यांच्या टेबलवर असलेली त्यांच्या नावाची पाटी चक्क डोक्यावर घेऊन इकडे ‘शिंदे साहेब आहेत का हो शिंदे साहेब’? असा आवाज देत संपूर्ण तहसीलमध्ये फेºया मारल्या. या प्रकाराने उपस्थित नागरिकांमध्ये एकच हश्शा पिकला होता. मात्र अशा कर्मचाºयांविरुद्ध अनेक जणांनी रोष व्यक्त केला. यासंदर्भात कनिष्ठ लिपिक  आर. व्ही. शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.  विभाग प्रमुखांनी द्यावे लक्ष कर्मचाºयांवर विभाग प्रमुखांचे नियंत्रण हवे. तहसीलमधील आवक-जावक विभागाचा कर्मचारी जर  गैरहजर राहत असेल तर त्या कर्मचाºयांविरुद्ध विभाग प्रमुखांनी ठोस कारवाई करणे गरजेचे आहे. कर्मचारी रजेवर असेल तर आवक-जावक विभागात दुसºया कर्मचाºयाची तात्पुरती नेमणूक करणे हे विभाग प्रमुखाचे काम आहे. मात्र या दोन पैकी कुठलाही प्रकार या ठिकाणी आढळून आलेला नाही.

टॅग्स :MehkarमेहकरbuldhanaबुलडाणाGovernmentसरकार