शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर पालिकेच्या आठ कर्मचार्‍यांवर बिनपगारीची कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:12 IST

मेहकर: शहरातील नागरिक आपल्या विविध कामांसाठी नगरपालिकेत येतात; परंतु कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याने नागरिकांची कामे होत नाहीत. त्यामुळे नगराध्यक्ष हाजी कासम गवळी यांनी २८ मे रोजी सकाळी ११ वाजता नगरपालिकेला अचानक भेट दिली. यावेळी विविध विभागातील ८ कर्मचारी गैरहजर असल्याने त्याची बिनपगारी करून दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. 

ठळक मुद्देकर्तव्यात कसूर करणे भोवले

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: शहरातील नागरिक आपल्या विविध कामांसाठी नगरपालिकेत येतात; परंतु कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याने नागरिकांची कामे होत नाहीत. त्यामुळे नगराध्यक्ष हाजी कासम गवळी यांनी २८ मे रोजी सकाळी ११ वाजता नगरपालिकेला अचानक भेट दिली. यावेळी विविध विभागातील ८ कर्मचारी गैरहजर असल्याने त्याची बिनपगारी करून दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. नगराध्यक्ष हाजी कासम गवळी यांच्या आईचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्यामुळे ते ४0 दिवस नगरपालिकेत आले नव्हते; परंतु घरी असतानाही  यांनी नगरपालिकेचे कोणतेही कामकाज थांबू दिले नाही. दरम्यान, २८ मे रोजी नगराध्यक्ष हाजी कासम गवळी यांनी नगरपालिकेला अचानक भेट देऊन सर्व विभागाची झाडाझडती घेतली असता कर विभागातील अशोक सिरसाट, अशोक मानवतकर, प्रकाश गायकवाड, जावेद गवळी, पाणीपुरवठा विभागातील संतोष हिवाळे, बांधकाम विभागातील अजय हडोळे, प्रकल्प विभागातील रमेश उतपुरे यामधील काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत गैरहजर होते. तर काही कर्मचारी सुटीचा अर्ज देऊन सुटी मंजूर न होताही गैरहजर होते. त्यामुळे नगराध्यक्ष हाजी कासम गवळी यांनी नागरीकांच्या समस्या लक्षात घेऊन कर्मचार्‍यांची मनमानी वाढल्याने ८ कर्मचार्‍याची बिनपगारी व ५00 रुपये दंड अशी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. या कारवाईमुळे पालिका परिसरात खळबळ उडाली आहे.

विकास कामांसाठी १३ कोटी रुपये मंजूर!शहरातील विविध वार्डातील विविध विकास कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी नगरपालिकेत असलेले जवळपास सर्व नगरसेवकांना विश्‍वासात घेऊन विकास कामे करण्यात येतील. शहरातील विकास कामांसाठी १३ कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती नगराध्यक्ष हाजी कासम गवळी यांनी दिली.

यापुढे जर कोणी कर्मचारी आपल्या कार्यालयीन वेळेत हजर राहत नसेल, तसेच केवळ सुटीचा अर्ज देऊन सुटी मंजूर न होता परस्पर गैरहजर राहत असेल तर अशा कर्मचार्‍यावर निलंबनाची कारवाईसुद्धा करण्यात येईल. -हाजी कासम गवळी, नगराध्यक्ष, मेहकर. 

टॅग्स :MehkarमेहकरTeacherशिक्षक