शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर : नृसिंह नवरात्रोत्सवाची साडेचारशे वर्षांची पंरपरा खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 16:47 IST

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ही पंरपरा यंदा प्रथमच खंडीत होणार आहे. 

कोरोनामुळे खरबदारी: उत्सवाचे आयोजक गुरूपिठाधिशांचा निर्णयबुलडाणा: मेहकर येथे साजरा होणारा नृसिंह नवरात्रोत्सवाला धार्मिक परंपरेचा मोठा वारसा लाभलेला आहे. याठिकाणी राज्यभरासह इतर राज्यातूनही काही भक्तवर्ग उत्सवासाठी येत असतात. जागतिक ख्याती असलेल्या मेहकरच्या अकरापैकी सहाव्या नृसिंह मंदिरातील साडेचारशे वर्षांची परंपरा असलेला नवरात्रोत्सव स्थगित करण्यात आला आहे. परंतू कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ही पंरपरा यंदा प्रथमच खंडीत होणार आहे. गीतेच्या अकराव्या अध्यायात उल्लेख असलेले मेहकरचे नृसिंह मंदिर हे जगातील पुराण-प्रसिद्ध अकरापैकी सहावे असल्यामुळे दूरवरून लोक दर्शनासाठी येथे येतात. पाकिस्तानातल्या मुलतान येथे अवतार घेतल्यानंतर नरसिंहाने भक्त प्रल्हाद व लक्ष्मीसह मेहकर येथे भोजन केले होते, अशी पौराणिक आख्यायिका आहे. अजूनही अस्तित्वात असलेल्या हेमाडपंती भुयारातून श्रीमूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना केल्यानंतर १५६९ सालापासून हा नवरात्रोत्सव अव्याहत सुरू आहे. दरवर्षी या उत्सवात हजारो भक्त दर्शनासाठी गर्दी करतात. यावर्षी २९ एप्रिल ते ८ मे या कालावधीत हा नृसिंह नवरात्रोत्सव आहे. मात्र कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विद्यमान पीठाधीश अ‍ॅड. पितळे महाराज यांनी हा धाडसी निर्णय घेतला आहे. यादरम्यान मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. या नवरात्रोत्सवातील गर्भगृहातील पूजाविधी व इतर अनुषंगिक कर्मकांडे वगळता दैनंदिन कीर्तन, महाआरती, सामुहिक हरिपाठ, काकडा, सामुहिक उपासना, पंचपदी भजन, काल्याचे कीर्तन, महाप्रसाद, वसंतपूजा आदि कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. 

‘भाविकांनी घरीच राहून पूजा करावी’कोरोनामुळे प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे. तेव्हा दरवर्षीप्रमाणे या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी भाविकांनी येऊ नये, घरीच राहून पूजा करावी, असे आवाहन नवरात्रोत्सवाचे आयोजक गुरुपीठाधीश अ‍ॅड.रंगनाथ महाराज पितळे यांनी केले आहे. गेल्या ६० वर्षांपासून या मंदिराचे सणवार, उत्सव, नवरात्र, पूजाअर्चा, देवाचा पोशाख आदि जबाबदारी अ‍ॅड. रंगनाथ महाराज पितळे यांच्यावर आहे. त्यांच्या पोषाखसेवेला गेल्यावर्षी पाच तपे पूर्ण झाली. १९४० ते १९५९ पर्यंत समर्थ सद्गुरू दिगंबर महाराज यांनी हा वारसा सांभाळला. तर १९६० पासून त्यांनी अ‍ॅड. रंगनाथ महाराज यांच्याकडे ही धुरा सोपविली. हा वारसा जपण्यासाठी पीठाधीशांना नऊ दिवसांची गुह्य पद्धतीची पारंपरिक साधना व विशिष्ट अनुष्ठान करावे लागते.

टॅग्स :Mehkarमेहकरbuldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्याIndian Festivalsभारतीय सण