शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

अंत्यविधीसाठी पोलिस ठाण्यात घ्यावी लागली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 11:00 IST

चक्क दोन तास झालेल्या बैठकीत आपसी शाब्दीक वादही झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जोहर नगरमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याच्या विरोधाचा मुद्दा पुन्हा पोलिस ठाण्यात पोहोचला. येथे चक्क दोन तास झालेल्या बैठकीत आपसी शाब्दीक वादही झाले.त्यानंतर आलटून पालटून जोहर नगर व संगम तलाव स्थित स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या तथा नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिलेल्या मृत व्यक्तींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय शिवसेना,भाजपच्या नगरसेवकांसह नगराध्यक्षांचे पती मोहमंद सज्जाद यांच्यात आपसात झाला व गुळभेली येथील मृत व्यक्तीचे पार्थिव संगम तलावस्थित स्मशानभूमीत नेण्यात आले. तेथेही सकाळपासूनच पालिकेचे चार कर्मचारी पीपीई किट घालून पार्थिव अंत्यविधीसाठी कधी येते याची वाट पाहत होते.पोलिस ठाण्यातील शाब्दीक चकमक व अधिकाऱ्यांच्या मध्यस्तीनंतर तुर्तास हा प्रश्न निकाली निघाला असला तरी येत्या काळात जिल्ह्यात कोरोना संसर्गाची वाढती व्याप्ती व त्याच्या तुलनेच जवळपास तीन टक्के होणारे मृत्यू पाहता भविष्यात हा मुद्दा चांगलाच चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.खुद्द उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, एसडीपीओ रमेश बरकते, तहसिलदार संतोष शिंदे, ठाणेदार प्रदीप सोळंकी यांच्या उपस्थितीत हा काथ्याकूट झाला.यावेळी प्रशासनाने पालिका उपाध्यक्ष विजय जायभाये, गटनेते अशोक इंगळे, नगरसेवक अरविंद होंडे, बाहेकर आणि जोहेरनगरमधील स्मशानभूमीत कोरोना अंत्यविधीसाठी विरोध मोहम्मद सज्जाद यांना आपसातच सामंजस्याने निर्णय घेण्याचे सोडले होते. त्यात हा सुवर्ण मध्य निघाला. मात्र प्रशासना जो निर्णय घेईल हे सर्वांसाठी बंधनकारक राहील, हे बजावण्यासही उपविभागीय ््अधिकारी राजेश्वर हांडे यांनी बजावले आहे. तुर्तास प्रकरण शांततेत मिटले असले तरी प्रशासनाने काही बाबी प्रोसेडींगवर घेतल्यास अंत्यसंस्काराच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या या राजकारणात काहींची चांगलीच गोची होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या