शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बनावट रेमडेसिविर प्रकरणातील सूत्रधार सुटणार नाहीत- डॉ. राजेंद्र  शिंगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 10:16 IST

Dr. Rajendra Shingane : लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, असे अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : बनावट रेमडेसिविर विक्री प्रकरणातील सूत्रधार कदापिही सुटणार नाही. या प्रकरणातील सूत्रधारांच्या आम्ही मागावर असून योग्य टप्प्यात त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सोबतच राजकीय हस्तक्षेप करून दबाव आणण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर तो कितीही मोठा असला तरी लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, असे राज्याचे अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी रविवारी बुलडाणा येथे स्पष्ट केले.बुलडाणा शहरात दोन दिवसांपूर्वी बनावट रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन नामांकित रुग्णालयातील कर्मचारी, वॉर्डबाय यांना ९ इंजेक्शनसह अटक केली आहे. १० मेपर्यंत या आरोपींना पोलिस कोठडी देण्यात आली आहे. नांदुरा येथेही दहा रेमडेसिविर इंजेक्शन पोलिसांच्या कारवाईत जप्त करण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकरणाचा सखोल तपास पोलिस करत आहेत. दोषींवर कारवाई होईलच. या प्रकरणाच्या मागे असलेले सूत्रधार नेमके कोण आहेत हे लक्षात आले आहे. फार दिवस ते लपून राहू शकत नाहीत. योग्यवेळी आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, असे राज्याचे अन्न व अैाषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले. कोरोना संसर्ग प्रतिबंध आढावा बैठकीच्या निमित्ताने ते ९ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली. सूत्रधारांना  वाचविण्यासाठी जर कोणी राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर तो आम्ही मान्य करणार नाही, असे स्पष्ट केले.

टॅग्स :Dr. Rajendra Shingeडॉ. राजेंद्र शिंगणेremdesivirरेमडेसिवीरbuldhanaबुलडाणा