शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
4
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
5
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
6
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
7
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
8
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
9
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
10
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
11
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
12
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
13
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
14
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
15
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
16
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
17
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
18
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
19
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
20
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?

पुणे दरोड्याचा मास्टरमाईंड बुलडाण्याचा जावई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 14:16 IST

आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली असून राजस्थानमधील मनिष यादव आणि श्याम नामक दोन आरोपींचा सध्या पुणे पोलिस शोध घेत आहे.

ठळक मुद्देआयआयएफएल गोल्ड लोन दरोडा प्रकरणात पोलिसांच्या तपासात एकूण चार आरोपी. दीपक विलास जाधव (३२) यास अटक केली असून त्याच्याकडून आठ किलो ६०० ग्रॅम सोने जप्त केल आहे. बुलडाणा येथील कृषी विभागातील सेवानिवृत्त अधिकाºयाचा दीपक जाधव जावाई आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पुण्यातील चंदननगरमधील आयआयएफएल गोल्ड लोन वरील दरोड्याप्रकरणी पुणे पोलिसांनी बुलडाण्यातून एका अधिकाऱ्याचा जावाई असलेल्या दीपक विलास जाधव (३२) यास अटक केली असून त्याच्याकडून आठ किलो ६०० ग्रॅम सोने जप्त केल आहे. दरम्यान या दरोडा प्रकरणातील मुख्य सुत्रधार तोच असल्याचे चंदननगर पोलिस ठाण्याती अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली असून राजस्थानमधील मनिष यादव आणि श्याम नामक दोन आरोपींचा सध्या पुणे पोलिस शोध घेत आहे.पुणे पोलिसांनी बुलडाणा शहर पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने सात डिसेंबर रोजी दुपारी चार ते रात्री उशिरापर्यंत ही कारवाई केली. दरम्यान, बुलडाणा येथून पथकाने एमएच २८-एएन- ५०५० क्रमांकाची गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे. पुण्यातील चंदन नगर परिसरात आआयएफएल ही गोल्ड लोन कंपनी अर्थात इंडिया इन्फोलीन फायनान्स लिमिटेडमध्ये (आयआयएफएल) पाच डिसेंबर रोजी दरोडा टाकण्यात आला होता. त्यामध्ये तब्बल १२ किलो वजनाचे चार कोटी २० लाख रुपयांचे तारण ठेवलेले सोने बंदुकीच्या धाकावर लुटण्यात आले होते. जवळपास ३९४ पॅकेटमध्ये ते ठेवण्यात आलेले होते. पाच डिसेंबर रोजी बंदुकीच्या धाकावर या आआयएफएलमध्ये दरोडा टाकून हे सोने लुटण्यात आले होते.दरम्यान, त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, स्थानिक पातळीवर मिळालेले सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली कार याची खबºयाकडून माहिती मिळाल्यानंतर चंदननगर पोलिसांनी बारकाईने विश्लेषण करत चंदननगर पोलिसांनी सात डिसेंबर रोजी बुलडाणा गाठले होते. बुलडाणा शहरातील आरास ले आऊटमधील एका व्यक्तीच्या घरी स्थानिक पोलिसांच्या मदतीने जात या पथकाने तेथून दीपक विलास जाधव (३२, रा. फ्लॅट नं. ६०९, ज्युबल्ेन बिल्डींग, वाघोली, पुणे) यास अटक केली. बुलडाणा येथील कृषी विभागातील सेवानिवृत्त अधिकाºयाचा दीपक जाधव जावाई आहे. दरम्यान, त्याचा एक नातेवाईकही संशयावरून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो वाशिम जिल्ह्यातील रहिवाशी आहे. त्याची सध्या चौकशी करण्यात येत आहे. शनिवारी दुपारी तीन ते सायंकाळी उशिरापर्यंत चंदनगर पोलिसांनी येथे कारवाई करत दीपक जाधवकडून शौचालयात ठेवलेले आठ किलो ६०० ग्रॅम सोने जप्त केले असल्याची माहिती आहे.दरम्यान, पुणे येथील या पथकाने प्रकरणातील दुसºया आरोपीसही चंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतूनच अटक केली असून सनी केवल कुमार (२९,रा. ८१२, सतरंजी चौक, लोणार गल्ली, पणे) यास अटक केली असल्याची माहिती एपीआय गजानन जाधव यांनी दिली. (प्रतिनिधी)तीन कोटींचा मुद्देमाल जप्तया प्रकरणात पोलिसांनी अताापर्यंत तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात १२ किलो सोन्यापैकी आठ किलो ६०० ग्रॅम सोने, गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार एमएच-२८-एएन-५०५० ही ताब्यात घेण्यात आली आहे. उर्वरित मुद्देमालही लवकरच आम्ही हस्तगत करू असे एपीआय गजानन जाधव यांनी बोलताना सांगितले. चंदनगर पोलिस ठाण्याचे एपीआय गजानन जाधव, अजित धुमाळ, तुषार खराडे, तुषारा अल्हाट, चेतन गायकवाड, कृष्णा बुधवत, सुभाष आव्हाड यांनी बुलडाण्यात कारवाई केली. त्यांना बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेचे दोन कर्मचारी आणि बुलडाणा शहर पोलिस ठाण्यातील एका महिला पोलिस कर्मचाºयांनी या पथकास मदत केली.चार पैकी एक आरोपी राजस्थानातीलआयआयएफएल गोल्ड लोन दरोडा प्रकरणात पोलिसांच्या तपासात एकूण चार आरोपी निष्पन्न झाले असून मनिष यादव नामक आरोपी हा राजस्थानमधील रहिवाशी असून त्याचा एक श्याम नामक साथीदारही आहे. दीपक विलास जाधवने चौकशीत या दोघांची नावे सांगितली असून पुणे पोलिस सध्या त्यांच्या मागावर आहे. दरम्यान प्रकरणातील चौथा आरोपी सनी केवल कुमार हाही पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे.वाशिमच्याही एकाचीही चौकशी दीपक विलास जाधव याचा जवळचा नातेवाईक असलेल्या वाशिम येथील एकास ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाशी त्याचा काही संबंध आहे का? याचा तपासही चंदननगर पोलिस करत आहे. आतापर्यंतच्या चौकशीत मात्र त्यादृष्टीने काही निष्पन्न झाले नसल्याचे अधिकाºयांनी सांगितले. या प्रकरणी आणखी एकाचीही पोलिस चौकशी करीत असल्याची माहिती आहे.

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी