शहरं
Join us  
Trending Stories
1
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
2
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
3
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
4
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
5
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
6
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
7
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
8
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
9
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
10
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
11
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
12
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
13
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
14
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
15
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
16
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
17
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
18
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
19
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
20
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
Daily Top 2Weekly Top 5

हुतात्मा प्रदीप मांदळे यांचे पळसखेड गावात होणार स्मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 11:10 IST

Martyr Pradip Mandale News स्मारकाच्या जागेची पाहणी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी १९ डिसेंबर रोजी केली.

ठळक मुद्दे १५ डिसेंबर रोजी अंगावर बर्फाचा ढीग पडून प्रदीप मांदळे हे हुतात्मा झाले होते. हुतात्मा जवान प्रदीप मांदळे यांचे गावात स्मारक असावे अशी ग्रामस्थांची इच्छा होती.

 लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील हुतात्मा जवान प्रदीप मांदळे यांचे गावात स्मारक होणार असून, या स्मारकाच्या जागेची पाहणी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी १९ डिसेंबर रोजी केली. हुतात्मा जवान प्रदीप मांदळे यांचे गावात स्मारक असावे अशी ग्रामस्थांची इच्छा होती. त्यानुषंगाने या स्मारकासाठीची आवश्यक ती कार्यवाही त्वरित पूर्ण करावी, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.दरम्म्यान, प्रदीप मांदळेंच्या पार्थिवावर २० डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जम्मू काश्मीरमधील द्रास सेक्टरमध्ये कर्तव्यावर असताना १५ डिसेंबर रोजी अंगावर बर्फाचा ढीग पडून प्रदीप मांदळे हे हुतात्मा झाले होते.  याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी तातडीने त्यांच्या राहत्या गावी पळसखेड चक्का येथे सांत्वनपर भेट देऊन शोकसंवेदना व्यक्त केल्या होत्या. पळसखेड चक्कामधील प्रदीप मांदळे हे २००८ मध्ये औरंगाबादला घेण्यात आलेल्या सैन्य भरतीमध्ये महार रेजिमेंटमधून देशसेवा करण्यासाठी भरती झाले होते. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. साहेबराव मांदळे यांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी प्रदीप मांदळे यांच्यावर आली होती. अशा परिस्थितीतदेखील त्यांनी देशसेवेसाठी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. लहान भाऊ विशाल हादेखील सैन्यामध्ये कार्यरत आहे.  तर दुसरा भाऊ संदीप हा कृषी सहायक आहे.हुतात्मा जवान प्रदीप मांदळे यांचे भाऊ म्हणाले की प्रदीप मांदळे हे अत्यंत चांगल्या स्वभावाचे व घराला पुढे नेणारे होते. हुतात्मा प्रदीप मांदळे यांच्या पार्थिवावर २० डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या मूळ गावी पळसखेड चक्का येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील

टॅग्स :buldhanaबुलडाणाMartyrशहीदDr. Rajendra Shingeडॉ. राजेंद्र शिंगणे