शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील बाजारातील बैठक वादाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 14:46 IST

बुलडाणा: नागरी भागांचा वाढता विस्तार पाहता जिल्ह्यातील शहरी भागातील आठवडी बाजारातील बैठक व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासोबतच त्याचा विस्तार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

बाजारात पोलिस तैनात: बैठक व्यवस्थेच्या कारणावरून हातगाडीवाल्यांची धावपळबुलडाणा: नागरी भागांचा वाढता विस्तार पाहता जिल्ह्यातील शहरी भागातील आठवडी बाजारातील बैठक व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासोबतच त्याचा विस्तार करण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, या समस्येमुळे बुलडाणा येथील बाजारात  पोलिस, हातगाडीवाले तथा भाजीपाला विक्री करणाºयांमध्ये नेहमीच वादाचे प्रसंग ओढावत आहे.  बाजारातील बैठक वादाच्या भोवºयात अडकल्याने फेरीवाला धोरणाची शहरी भागात प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता दिसून येत आहे. बुलडाणा येथील बाजार हा केवळ शहरापुरताच मर्यादीत नसून जिल्ह्यासाठी महत्वाचा आहे. येथे कापड मार्केट मोठे असल्याने बुलडाण्यासह चिखली, मेहकर लोणार, सिंदखेड राजा, मोताळा, मलकापूर तालुक्यातील नागरिकही रविवारच्या दिवशी बुलडाणा बाजारामध्ये येतात. पोलिस अधिक्षक कार्यालयासमोरुन गेलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजुला व मध्यभागी कापड विके्रते आपले दुकान थाटतात. त्यात हातगाडी वाल्यांची गर्दी वेगळीच. त्यामुळे या रस्त्याने ग्राहकांना चालणे अवघड होते. हातगाडी वाले रस्त्यावर गाड्या लावत असल्याने व त्याचठिकाणी भाजीपाला विक्रेते बसत असल्याने या रस्त्याने एकही वाहन जावू शकत नाही. रस्त्यावरील ही कोंडी मोकळी करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून नेहमी प्रयत्न करण्यात येतात; मात्र हातगाडीवाले व पोलिस यांच्यामध्ये वाद होण्याचे प्रकार घडत आहेत. त्याचबरोबर हातगाडीवाले व भाजीपाला विक्रेते यांच्यामध्येही बैठक व्यवस्थेच्या कारणावरून रविवारच्या दिवशी वादाचे प्रसंग घडातात.  बाजारातील वादाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस प्रत्येक ठिकाणी तैनात करण्यात आल्याचे दिसून येत आहे. हातगाडीवाले व भाजीपाला विक्रेते  रस्त्याच्या मध्यभागी बसू नये, यासाठी थोड्या-थोड्या वेळाने पोलिसांचे वाहन या रस्त्याने फिरते. परंतू पोलिसांचे वाहन जाताच पुन्हा या रस्त्यावर विक्रेत्यांची गर्दी जमते. हातगाडीवाले व इतर विक्रेत्यांची संख्या वाढली असल्याने बैठक व्यवस्था अपूरी पडत असल्याचे दिसून येत आहे.  एकाच व्यक्तीचे अनेक दुकानेबैठक व्यवस्थेसाठी परवानगी एका ठिकाणची काढून एकाच व्यक्तीचे चार ते पाच ठिकाणी दुकाने दिसून येतात. त्यामुळे इतरांना जागा मिळत नाही. शिवाय ग्रामीण भागातून येणाºया भाजीपाला विक्रेत्यांनाही काही  स्थानिक हातगाडीवाले बसू देत नसल्याचा प्रकारही येथे होतो. त्यामुळे वादाचे प्रामाण वाढते. 

 ‘गाडी आली पळापळा’...रस्त्याच्या मध्यभागी हातगाडीवाले आपले दुकान थाटत असल्याने पोलिसांची गाडी बाजाराच्या रस्त्यावरून फिरते. परंतू पोलिसांची गाडी आली की, हातगाडीवाले एकमेकांना लगेच सतर्क करून रस्त्याच्या बाजुला हातगाडी पळवतात. त्यामुळे पोलिसांचे वाहन दिसताच ‘गाडी आली पळापळा’... असे शब्द या हातगाडीवाल्यांच्या तोंडून येथे ऐकायला मिळतात.  वाहने उभी करण्याचा प्रश्नबुलडाण्याच्या बाजारामध्ये इतर तालुक्यातूनही लोक येत असल्याने ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होते. परंतू येणाºया ग्राहकांना आपली मोटारसायकल व इतर वाहने लावण्यास मोठी अडचण येते. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सध्या वाहने उभी करण्यात येतात. मात्र त्याठिकाणी सुद्धा वाहने लावण्यासाठी जागा कमी पडत असल्याचे दिसून येते. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाMarketबाजार