शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

वाढत्या उन्हामुळे बाजारपेठ सुस्तावली!

By admin | Updated: April 21, 2017 00:46 IST

खामगाव : दिवसेंदिवस उष्णतामान वाढत असून सध्या सूर्य आग ओकू पाहत आहे. वाढत्या उन्हामुळे बाजारपेठ देखील सुस्तावलेली आहे.

ठिकठिकाणी लागली थंड पेयाची दुकानेखामगाव : दिवसेंदिवस उष्णतामान वाढत असून सध्या सूर्य आग ओकू पाहत आहे. वाढत्या उन्हामुळे बाजारपेठ देखील सुस्तावलेली आहे. अंग भाजणाऱ्या उन्हामुळे शहरवासी सकाळी १०-११ वाजेपर्यंत बाजारपेठेतील कामे आटोपण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे वाढत्या उन्हाचा बाजारपेठेवरही परिणाम होत असल्याचे दिसून येते.उन्हापासून बचावासाठी नागरिक डोक्यावर कॅप, दुप्पटा बांधूनच घराबाहेर पडत आहेत. जीवाची लाही लाही करणारे ऊन सध्या असल्याने दुपारच्या वेळी रस्तेही सुनसान दिसतात. मुके प्राणीही झाडाच्या सावलीचा आसरा घेताना दिसतात. थोड्या काही प्रमाणातच नदीत पाणी सध्या शिल्लक आहे. नदीपात्रातील शेवाळ व विविध प्रकारच्या वनस्पतीही उन्हामुळे माना टाकत आहेत. पूर्वी जनावरेही नदीपात्रातील पाणी पिऊन आपली तृष्णा तृप्ती करीत. तसेच नदी परिसरातील हिरव्या चाऱ्यावर मोठ्या आनंदाने ताव मारत. परंतु सध्या नदीला पाणीही कमी असल्याने व नदी परिसरात चाराही नसल्याने जनावरांची भटकंती होत आहे. शहरातील मोठमोठ्या वृक्षाच्या सावलीत ही जनावरे बसून उन्हापासून आपला बचाव करीत असल्याचे बघावयास मिळते. परंतु सध्या पाहिजे त्या प्रमाणात शहरात वृक्ष नसल्याने वृक्षारोपण मोहिम हाती घेण्याची गरज आहे. शहरात ठिकठिकाणी सध्या थंड पेय व साहित्याची दुकाने लागली आहेत. वाढत्या गर्मीपासून काहीसा दिलासा मिळावा म्हणून अनेकांनी ऐरवी बंद राहणारे कुलर सध्या सुरु केले आहेत. मात्र, मुक्या प्राण्यांना उन्हापासून बचाव करण्यासाठी झाडांच्या सावलीचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ‘ग्रीन सिटी’साठी प्रयत्न करण्याची गरजपूर्वी शहरातील अनेक भागात मोठमोठाले वृक्ष होते. परंतु विकासाच्या नावाखाली ते तोडण्यात आले. जे मोठाले वृक्ष सध्या शहरात आहेत त्यांच्या सावलीचा आधार मुके प्राणी घेताना दिसतात. ग्रीन सिटी करण्यासाठी स्थानिक न.प. प्रशासनाने विशेष प्रयत्न करावे, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.