अमडापूर: माहेराहून दहा लाख रुपये आणण्यासाठी विवाहीतेचा शारीरिक व मानसिक छळ करीत तिचा गर्भपात केल्याप्रकरणी अमडापूर पोलिस ठाण्यात चंद्रपूर कारागृहात कार्यरत असलेल्या पोलिस शिपायासह त्याच्या कुटुंबाटीत चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित विवाहीता श्वेता लोकेश आराध्ये हीने २७ आॅगस्ट रोजी अमडापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पीडित महिलेचा पती लोकेश सुधाकर आराध्ये, सासू सुरेखा सुधाकर आराध्ये (रा. खापरी रोड, नागपूर), विलास केशव बिडकर, वैशाली बिडकर (कोराडी, नागपूर) यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २४ फेब्रुवारी २०१९ रोजी लोकेश व श्वेताचा विवाह झाला होता. मात्र नंतर माहेराहून श्वेताच्या वाट्याचे दहा लाख रुपये तिने आणावे, असा तगादा सासरकडील मंडळींनी लावला होता. पैशाची मागणी श्वेता पूर्ण न करू शकल्याने सासरकडील मंडलींनी प्रसंगी तिला न वागवण्याची धमकीही दिली होती. सोबतच मानसिक व शारीरिक छळ करून तिचा गर्भपात केला. अशा आशयाची तक्रार तिने अमडापूर पोलिस ठाण्यात केली. सध्या उन्दीर येते ती राहते. प्रकरणी तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी सासरच्या चार व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार अमित वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल शाकिर पटेल हे करीत आहेत. (वार्ताहर)
हुंड्यासाठी विवाहीतेचा छळ; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 16:55 IST