शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील ४० मार्गांना 'मार्च एंड'ची डेडलाईन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 18:03 IST

बुलडाणा: जिल्ह्यातील ४० ठिकाणच्या रस्त्याच्या कामांना मार्च एंडची डेडलाईन असल्याने रस्ते विकासाची कामे सध्या वेगात सुरू आहेत.

 - ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: जिल्ह्यातील ४० ठिकाणच्या रस्त्याच्या कामांना मार्च एंडची डेडलाईन असल्याने रस्ते विकासाची कामे सध्या वेगात सुरू आहेत. जिल्ह्यातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्याच्या कामांसाठी ९३ कोटी ४५ लाख ७ हजार रुपयांपर्यत निधी खर्च करण्यात येत आहे. यामध्ये ग्रामीण भागातील रस्त्यांवर नवीन डांबरीकरण, रुंदीकरण, नुतनीकरण, रस्ते खड्डेमुक्त तथा अन्य दुरूस्तीची कामे करण्यात येत आहेत. शासनाने राज्यभर रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेतलेली आहेत. रस्ते हे विकासाच्या नाड्या असतात. त्यामुळे सर्वत्र जलदगतीने रस्त्यांचा विकास करण्यास शासनाकडून प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व गावे पक्क्या व डांबरी रस्त्याने जोडण्यात येत आहेत. जिल्ह्यातून जाणारे प्रमुख राज्य महामार्ग आणि राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्गात रुपांतरित करण्यात आल्याने जिल्ह्यात राज्य महामार्गाचा अनुशेष निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी ५५८ किलोमिटर झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख राज्य महामार्ग आणि राज्य मार्गाची संख्या व लांबी कमी झाली आहे. मलकापूर-जालना हा प्रमुख राज्य महामार्ग राष्ट्रीय माहामार्ग बनल्यामुळे जिल्ह्यातील मुख्य जिल्हा मार्ग, अन्य जिल्हा मार्ग काही ग्रामीण रस्तेही आता चकाकत आहेत. सार्वजनीक बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यातील ४० ठिकाणच्या रस्त्यांची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. मार्च २०१८ मध्ये ९३ कोटी ४५ लाख ७ हजार रुपये निधी या रस्ता कामांसाठी मंजूर करण्यात आला होता. मार्च २०१९ पर्यंत ही कामे पूर्ण करावे लागत असल्याने सध्या या कामांकडे लक्ष दिल्या जात आहे. यामध्ये प्रमुख जिल्हा मार्ग व ग्रामीण भागतील अंतर्गत रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. रस्त्यांच्या दुरूस्तीबरोबरच रुंदीरकण, डांबरीकरण, मजबुतीकरण, नुतनीकरण करण्याचे कामे होत आहेत. 

 पुलांच्या बांधकामाचाही समावेशसावर्जनीक बांधकाम विभागाने रस्त्याबरोबरच पुलांच्या बांधकामाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यातील दहा ठिकाणी छोट्या-मोठ्या पुलांचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे. त्यामध्ये सिंदखेड राजा, मोताळा, चिखली, मेहकर, देऊळगाव राजा या तालुक्यातील दहा पुलांचा समावेश आहे. या कामांसाठी कोटी रुपये निधी खर्च अपेक्षीत आहे. 

रस्त्याची कामे युद्धपातळीवरआगामी लोकसभा निवडणुक व आचार संहिता लागण्यापूर्वी ही विकास कामे पूर्ण व्हावीत, यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. आचार संहितेच्या अनुषंगाने रस्त्याची कामे सुद्धा युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. नोव्हेंबरमध्ये काही रस्त्यांच्या नव्या कामांनाही मान्यता देण्यात आलेली आहे. ती कामेही लवकरच सुरू होणार आहेत. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाroad transportरस्ते वाहतूक