शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation Protest: मेहकरमध्ये खासदार, आमदारांच्या घरासमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 18:06 IST

मेहकर : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने शुक्रवारी येथील खा. प्रतापराव जाधव आणि आ. डॉ. संजय रायमुलकर यांच्या निवासस्थानासमोर मराठा समाज बांधवांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देनऊ आॅगस्ट पासून जिल्ह्यात चक्का जाम आंदोलनाचा इशारा रविकांत दुपकर यांनी दिला आहे. मागण्यांचे निवेदन खासदार प्रतापराव जाधव यांचे पूत्र ऋषी जाधव यांना देण्यात आले. आंदोलनामध्ये सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

मेहकर : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने शुक्रवारी येथील खा. प्रतापराव जाधव आणि आ. डॉ. संजय रायमुलकर यांच्या निवासस्थानासमोर मराठा समाज बांधवांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, सात आॅगस्टपर्यंत सरकारने आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास नऊ आॅगस्ट पासून जिल्ह्यात चक्का जाम आंदोलनाचा इशारा रविकांत दुपकर यांनी दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सध्या सकल मराठा समाज एकत्र आला असून या आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. गेल्या वर्षी तब्बल ५८ मुकमोर्चे काढण्यात आले होते. त्यानंतर यावर्षीही या आंदोलनाची तीव्रता वाढील असून राज्यभर आंदोलने होत आहे. काही ठिकाणी त्यास हिंसक वळणही लागले होते. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्याच्या समर्थनार्थ शुक्रवारी मराठा समाज बांधवांनी आमदार, खासदारांच्या निवास स्थानासमोर धरणे दिले. यात शिवाजी नगरमधील खा. प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानासमोर सकल मराठा समाजाच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. सोबतच सकल मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन खासदार प्रतापराव जाधव यांचे पूत्र ऋषी जाधव यांना देण्यात आले. यानंतर सकल मराठा समाजाने घोषणा देत विविध मार्गाने जात रामनगरातील आ. डॉ. संजय रायमुलकर यांच्या निवासस्थानासमोरही धरणे देत निवेदन दिले. यावेळी पोलिसांचा बंदोबस्तही मोठा होता. आंदोलनामध्ये सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMehkarमेहकरPrataprao Jadhavप्रतावराव जाधवSanjay Raymulkarसंजय रायमुलकर