शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रोहणा गावामध्ये अनेकांच्या घरांचे पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झाले.

By विवेक चांदुरकर | Updated: July 8, 2024 14:11 IST

रोहणा गावामध्ये अनेकांच्या घरांचे पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झाले.

पोरज : खामगाव तालुक्यातील रोहणा, पोरज, निमकवळा, तांदुळवाडी परिसरातील नागरिकांना जोरदार पावसाचा तडाखा बसला. या भागातील अनेकांच्या घरांची पडझड झाली असून, घरातील जीवनावश्यक वस्तुंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच जनावरे वाहून गेल्याने पशूपालकांचे नुकसान झाले आहे.

रोहणा गावामध्ये अनेकांच्या घरांचे पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झाले. रोहणा येथील प्रकाश काशीराम बोचरे यांचे ८ क्विंटल गहु, ५० बॅग सिमेंट, १० बॅग सासायनिक खताचे नुकसान झाले. अमोल समधान सावंग यांचे घर पडले. त्यांच्या घरावरील टिनपत्रे उडाले. तसेच प्रमिला अरुण शेजोळे, प्रकाश सिताराम सावंग, भीमराव सिताराम सावंग यांच्या घरात सुद्धा पाणी शिरल्याने दैनंदिन उपयाेगी वस्तुंचे नुकसान झाले. सुभाष जानू सावंग, रणजीत सावंग, मारुती सावंग, अनिल सावंग, मिलिंद उत्तम सावंग यांच्या घरात पाणी शिरले. गावालगत असलेल्या स्मशानभूमीजवळ डीपीचे नुकसान झाले आहे.

शेतीउपयोगी साहित्य गेले वाहून, पिकांचे नुकसानरोहणा येथील उत्तम शालिग्राम सावंग, संघपाल उत्तम सावंग यांचे शेतीचे अवजारे डवरे, वखर, तिफन पुरात वाहून गेले. शत्रुघ्न तुळशीराम सावंग यांचे शेतीतील अवजारे टिलर, रामेश्वर घोंगे यांच्या घरातील गहू ज्वारीचे नुकसान झाले. गोकुळ शेषराव सावंग यांच्या घरात पाणी शिरून खाण्यापिण्याचे वस्तु सामान आणि शेती आवश्यक अवजारे पाण्यात वाहून गेले. तसेच गावालगत असलेले शेषराव बळीराम सावंग यांच्या शेतात पाणी साचले असून पिकाचे नुकसान झाले आहे. सुमनबाई राजाराम नाईक यांच्या शेतात पाणी साचल्यााने पिकांचे नुकसान झाले.   

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस