शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

लग्नपत्रिका वाटप करून गावी परतणाऱ्या वधू पित्याचा अपघातात करुण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 13:59 IST

देऊळगावमही: मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटप करून गावी परतणाऱ्या वधूपित्याच्या दुचाकीस शिवशाही बसने धडक दिल्याने वधुपित्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली.

देऊळगावमही: मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटप करून गावी परतणाऱ्या वधूपित्याच्या दुचाकीस शिवशाही बसने धडक दिल्याने वधुपित्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. हा अपघात देऊळगावमही चिखली रोडवरील एका ढाब्यानजिक घडला.नजीकच्या डिग्रस बू. येथील उद्घव भानुदास खटके (वय ४५) हे चिखलीकडून आपल्या मुलीच्या लग्न पत्रिका वाटप करून दुचाकी (क्रमांक एम. एच. २८ एवाय ३५६८) या दुचाकीने देऊळगावमहीकडे परत येत होते. हॉटेल प्रसाद ढाब्याजवळ देऊळगावराजाकडून भरधाव वेगात असलेल्या शिवशाही पुणे-चिखली (एम.एच.०९ एम. १७७५) क्रमांकाच्या बसने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात उद्धव खटके यांच्या डोक्याला व पायाला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षापासून नागपुर -औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सिमेंट रस्त्याचे चौपदरीकरण सुरू आहे. अनेक ठिकाणी अर्धवट खोदकाम, रस्ते कामामुळे वाहतुकीस अडथळा ठरत आहे. या महामार्गावर दिवसागणिक अपघात होत असून, य अपघातामुळे निष्पाप लोकांचा बळी जात आहे. या राष्ट्रीय महामागार्चे काम जलद गतीने करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात